'अ परफेक्ट मर्डर' नाटकातून डॉ. श्वेता पेंडसेचं पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:04 PM2024-07-29T17:04:50+5:302024-07-29T17:05:22+5:30

Dr. Shweta Pendse : आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. आता ती 'अ परफेक्ट मर्डर’ या नाटकात झळकणार आहे.

From the play 'A Perfect Murder' Dr. Shweta Pendse's comeback | 'अ परफेक्ट मर्डर' नाटकातून डॉ. श्वेता पेंडसेचं पुनरागमन

'अ परफेक्ट मर्डर' नाटकातून डॉ. श्वेता पेंडसेचं पुनरागमन

आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे (Dr. Shweta Pendse) हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. आता ती 'अ परफेक्ट मर्डर’ (A Perfect Murder Marathi Play) या नाटकात झळकणार आहे. रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचं  वैशिष्टय असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत  दिसणार आहे. तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे.  बदामराजा प्रॉडक्शन्स संस्थेच्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे आहेत.

गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत या नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ  म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट  देण्यासाठी अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या  वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे.



खूप कमी सस्पेन्स नाटकं मनाचा ठाव घेतात,  नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत नाटकाची रंजकता वाढावी लागते. श्वेताच्या येण्याने नाटकाला काय कलाटणी मिळणार? ती खुनाचा कट ‘परफेक्ट’ उलगडू  शकेल का? हे पाहणं नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. ‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक म्हटलं की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाचा कस असतो. माझ्यासाठी ही भूमिका तितकीच चॅलेंजिंग असल्याचे डॉ.श्वेता सांगते.

नाटकाचा ३४५ प्रयोग
या नाटकाचा हा ३४५ प्रयोग असून ऑपेरा हाऊस मधील ५ व्या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस हे आहेत. ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचे लेखन आणि नेपथ्य नीरज शिरवईकर यांचं आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

Web Title: From the play 'A Perfect Murder' Dr. Shweta Pendse's comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.