नागीण आजारामुळे 'गलगले निघाले' फेम अभिनेत्रीला झालेला दुसराच गंभीर आजार, म्हणाली- "माझ्या चेहऱ्याची डावी बाजू..."

By कोमल खांबे | Updated: February 16, 2025 10:30 IST2025-02-16T10:30:08+5:302025-02-16T10:30:51+5:30

केतकीला Bell's palsy नावाचा आजार झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या आजाराबाबत भाष्य केलं. 

galgale nighale fame actress ketaki thatte talk about her rare disease due to nagin | नागीण आजारामुळे 'गलगले निघाले' फेम अभिनेत्रीला झालेला दुसराच गंभीर आजार, म्हणाली- "माझ्या चेहऱ्याची डावी बाजू..."

नागीण आजारामुळे 'गलगले निघाले' फेम अभिनेत्रीला झालेला दुसराच गंभीर आजार, म्हणाली- "माझ्या चेहऱ्याची डावी बाजू..."

'गलगले निघाले' या सुपरहिट सिनेमातून अभिनेत्री केतकी थत्ते प्रसिद्धीझोतात आली. केतकीने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. पण, करिअरच्या सुरुवातीलाच केतकीला चेहऱ्याचा गंभीर आजार झाला होता. केतकीला Bell's palsy नावाचा आजार झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या आजाराबाबत भाष्य केलं. 

केतकीने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या आजाराबाबत सांगितलं. ती म्हणाली, "Bsc केल्यानंतर माझं एक नाटक सुरू झालं होतं. एक मालिकाही मी करणार होते. तेव्हा २९ डिसेंबर २००५ रोजी माझ्या जीभेला सेन्सेशन गेल्यासारखं मला वाटलं. त्यावेळी माझी अक्कल दाड खूप दुखत होती. मला वाटलं त्यामुळे असं होत असेल. दुसऱ्या दिवशी माझ्या चेहऱ्याची डावी बाजू हलत नव्हती. मी दातांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी मला फिजिशियनकडे पाठवलं. त्यांनी मला सांगितलं की मला Bell's palsy झालं आहे. ही एक कंडिशन आहे जी एका आजारामुळे किंवा कमी झोप किंवा टेन्शन घेतल्यामुळेही होऊ शकते. यामध्ये तुमच्या चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्णपणे निकामी होतो. तुमची फेशियल नर्व्ह डॅमेज होते किंवा त्यावर प्रेशर येतं. पण, हे कशामुळे झालंय ते कळत नव्हतं. कोणत्या आजाराची काही लक्षणंही दिसत नव्हती". 

"काही दिवसांनी मला डाव्या कानावर नागिणीच्या पुळ्या दिसल्या. मी लगेच डॉक्टरांना दाखवलं. नागिण आजारात व्हायरस तुमच्या नर्व्हस सिस्टिमवर हल्ला करतो. यामध्ये माझ्या चेहऱ्याची नस डॅमेज झाली होती. आणि त्यामुळे मला Bell's palsy झाली होती. नर्व्ह रिजनरेट होतात. पण, चेहऱ्याची नर्व्ह कधीच रिजनरेट होत नाही. नागिण बरी होण्यासाठीच ३ महिने लागतात. त्यामुळे डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं की तू बरी होशील पण तुला खूप वेळ लागेल. माझा डावा डोळाही बंद होत नव्हता. डोळ्यातून पाणी येत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी मला मलम आणि ड्रॉप दिले होते", असं तिने सांगितलं. 

पुढे ती म्हणाली, "माझ्या आत्याचे पती एक मोठे डॉक्टर होते. आणि त्यांनी ओंकार साधना नावाचा एक प्रकार डेव्हलप केला होता. हा ७ दिवसांचा कोर्स होता. त्यांनी मला अहमदनगरला हा कोर्स करण्यासाठी बोलवून घेतलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी माझे डोळ्याचे ड्रॉप्स आणि मलम बंद केले. ओंकार साधना करायला लागल्यापासून चौथ्या दिवशी माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कोर्स पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी माझी चेहऱ्याची नर्व्ह बरी व्हायला सुरुवात झाली. आणि Bell's palsy मधून मी बाहेर पडायला लागले". 

Web Title: galgale nighale fame actress ketaki thatte talk about her rare disease due to nagin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.