Ganesh Chaturthi 2019: सेलिब्रेटींनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिले हे सामाजिक संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 15:56 IST2019-09-02T15:53:35+5:302019-09-02T15:56:14+5:30
सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपल्या लाडक्या बाप्पाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Ganesh Chaturthi 2019: सेलिब्रेटींनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिले हे सामाजिक संदेश
आज सगळीकडे गणरायाचे आगमन धुमधडाक्यात झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची आराधना सगळेच मनोभावे करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींकडे देखील आज बाप्पा विराजमान झाले असून अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या लाडक्या बाप्पाचे फोटो पोस्ट केले आहेत.
सुबोध भावेने आपल्या गणपती बाप्पाचा फोटो पोस्ट करत सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबत त्याने एक खूप छान संदेश दिला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, गणपती बाप्पा मोरया... गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा... बाप्पा सर्वांना उत्तम, निरोगी आणि आनंदी आयुष्य देवो. या वर्षी आमचा पुणे मेट्रोचा देखावा. विकास नक्कीच झाला पाहिजे, पण निसर्गाचा मान ठेवून, त्याचं रक्षण करून. तो टिकला तर आपण टिकणार आहोत.
अमेय वाघने त्याच्या बाप्पाचा फोटो पोस्ट करण्यासोबतच तुम्ही देखील इको फ्रेंडली गणपती बाप्पा बसवला ना... असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना विचारला आहे.
स्वप्नील जोशीने शेअर केलेल्या फोटोत तो बाप्पाला वंदन करताना दिसत आहे.
शरद केळकरने गणपती बाप्पाच्या फोटो पोस्ट करत त्याच्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत त्याची पत्नी अभिनेत्री किर्ती गायकवाड आणि त्यांच्या मुलीला पाहायला मिळत आहे.
चिन्मय मांडलेकरने देखील त्याच्या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे
सुयश टिळकने बाप्पा मोरया म्हणत बाप्पाचा फोटो पोस्ट केला आहे.
बाप्पा घरी आले असे लिहित सिद्धार्थ चांदेकरने बाप्पाचा फोटो पोस्ट केला आहे