अर्जुन कपूरच्या पानीपतमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 07:15 AM2019-06-17T07:15:00+5:302019-06-17T07:15:00+5:30

पानिपतमध्ये अर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा पानिपतच्या युद्धावर आधारित कथा आहे.

Gashmir Mahajan will play a role in arjun kapoor starr panipat | अर्जुन कपूरच्या पानीपतमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

अर्जुन कपूरच्या पानीपतमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देअर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे यांची भूमिका साकारणार आहे

'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी सिनेमातून झळकलेल्या अभिनेता गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. काही दिवसांपूर्वी गश्मीर एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत गश्मीर सेटवर केप कापताना दिसतोय. व्हिडीओला गश्मीरने कॅप्शनदेखील दिले आहे. त्यावरुन गश्मीरची वर्णी आशुतोष गोवारिकर यांच्या पानीपत सिनेमात लागल्याचे कळतेय. यात नेमका गश्मीर कोणती भूमिका साकारतोय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


हा सिनेमा पानिपतच्या युद्धावर आधारित  कथा आहे. यात गश्मीरसह संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत दिसणार आहे. तर  पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनन मेहनत घेत आहे.  ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 


यावर्षाच्या सुरुवातीलच गश्मीरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. आपल्या बाळासोबतचा एक फोटो त्यांने सोशल मीडियावर शेअर करून ही खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे.

आपल्या या लाडक्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून गश्मीरने ही खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे. 

Web Title: Gashmir Mahajan will play a role in arjun kapoor starr panipat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.