गश्मिर महाजनी झळकणार या चित्रपटामध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 11:40 AM2016-12-14T11:40:46+5:302016-12-14T11:40:46+5:30
सध्या मराठी कलाकारांची गाडी सुसाट निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नाटक, रंगभूमी, मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी अशा विविध ...
स ्या मराठी कलाकारांची गाडी सुसाट निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नाटक, रंगभूमी, मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी अशा विविध प्रांतिक भाषेतील एक से एक चित्रपटात मराठी कलाकार पाहायला मिळत असल्याचे दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच सोनाली कुलकर्णीनेदेखील तिच्या गुजराती चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. तिचा हा तिसरा चित्रपट असल्याचे तिने सोशलमीडियावर सांगितले होते. त्याचबरोबर अभिनेत्री श्रुती मराठे, पुष्कर जोग या कलाकारांच्या पाठोपाठ आता अभिनेता गश्मिर महाजनीदेखील दाक्षिणात्य चित्रपटामध्ये झळकणार असल्याचे समजत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये इतर कलाकारांप्रमाणेच गश्मिरला मोह आवरला नसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये तो सध्या व्यग्र असल्याचे कळत आहे. काही दिवसांपूर्वीच गश्मिरने बॉलिवूडमध्येदेखील पदापर्ण केले आहे. डोंगरी का राजा असे या बॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात तो बॉलिवूडची तगडी अभिनेत्री सनी लिओनी हिच्यासोबत आ़यटम साँन्ग करताना पाहायला मिळाला आहे. तसेच त्याचा कान्हा हा मराठी चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्याचा हा चित्रपट अवधूत गुप्तेचा होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता वैभव तत्ववादी आणि गौरी नलावडे पाहायला मिळाले होते. तसेच त्याने देऊळबंद, वन वे तिकीट असे अनेक सुपरहीट चित्रपटदेखील मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्याकडे सध्या मराठी चित्रपटाचेदेखील दोन चित्रपट असल्याचे कळत आहे. त्याचबरोबर नुकतेच त्याला पहिल्यांदा उत्कृष्ट कलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सध्या त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.