श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:38 AM2024-06-12T11:38:50+5:302024-06-12T12:02:59+5:30

सबसे कातिल...! 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करून गौतमी पाटीलने केला विषय End

gautami patil dance on angaron sa pushpa 2 song video goes viral | श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..."

श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..."

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या दाक्षिणात्य सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'मधील 'अंगारों सा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गाणं प्रदर्शित होताच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. आता गौतमी पाटील हिला देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. 

सोशल मीडिया स्टार आणि लावणी डान्सर असलेल्या गौतमी पाटीलला कोण ओळखत नाही. नखरेल अदांनी गौतमी चाहत्यांना घायाळ करते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. गौतमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा गौतमी ट्रेंडिंग गाण्यावरील रील्सही शेअर करताना दिसते. आता गौतमीने श्रीवल्लीच्या अंगारो सा गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओत गौतमी अंगारो सा गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसून या गाण्यावर डान्स केला आहे. गौतमीने या व्हिडिओत तिच्या कातिल अदा दाखवल्या आहेत. अंगारो सा गाण्यावरील गौतमीच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. गौतमीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

२०२१ साली 'पुष्पा' हा दाक्षिणात्य सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. पुष्पाची स्टाइल आणि त्याचे डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  आता या सिनेमाचा स्वीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ ऑगस्टला 'पुष्पा २' प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: gautami patil dance on angaron sa pushpa 2 song video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.