'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका...', गौतमीचं 'चीझ लई कडक' हे गाणं पाहिलतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 07:00 PM2023-12-25T19:00:21+5:302023-12-25T19:02:50+5:30

'चीझ लई कडक' असं गौतमीच्या या नव्या गाण्याचं नाव आहे.

gautami patil new song Cheez Lai Kadak out viral on social media | 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका...', गौतमीचं 'चीझ लई कडक' हे गाणं पाहिलतं का?

'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका...', गौतमीचं 'चीझ लई कडक' हे गाणं पाहिलतं का?

‘सबसे कातिल.. गौतमी पाटील’ हा डायलॉग म्हणताच डोळ्यांसमोर नृत्यांगना गौतमी पाटीलचा चेहरा समोर येतो.  गौतमी कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यात सारखी चर्चेत असते. गौतमीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची अक्षरश: झुंबड उडते. हीच गौतमी आता तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. तिचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून यात गौतमीने आपल्या नृत्यातून आणि दिलखेचक अदांनी तरुणांना घायाळ केलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

'चीझ लई कडक' असं गौतमीच्या या नव्या गाण्याचं नाव आहे.  गौतमी पाटीलच्या या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर  पोस्ट करण्यात आला आहे. या गाण्यात गौतमी पाटील ही पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे.  गुंडांच्या अड्ड्यावर जबरदस्त डान्सच्या माध्यमातून गौतमी गुंडांना घायाळ करते. त्यानंतर पोलिस सर्वांना अटक करताना पाहायला मिळतात.   

गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन हे विकी वाघ यांनी केले. तर हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे. गौतमीच्या या नव्या गाण्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे.  त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'एकदम कडक गीत ! अप्रतिम संगीत ! लाजवाब नृत्य ! बेधुंद अदाकारी ! अभिनय शानदार ! उत्तम दिग्दर्शन', अशा कमेंट्स चाहते करताना दिसत आहे.  

यापुर्वी गौतमी पाटीलचे 'घोटाळा', 'दिलाचं पाखरू', 'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'पाटलांचा बैलगाडा' हे गाणे रीलिज झाले आहेत. या सर्व गाण्यांना प्रेक्षकांनी खूपच चांगली पसंती दिली होती. गौतमी जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच तिच्यावर होणारी टीकाही लक्ष वेधून घेत असते. तरीही तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 
 

Web Title: gautami patil new song Cheez Lai Kadak out viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.