Gautami Patil Video : कपडे बदलतानाच्या व्हिडीओवर बोलताना गौतमी पाटीलला कोसळलं रडू, म्हणाली - 'त्याच्या घरात...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 02:21 PM2023-04-13T14:21:06+5:302023-04-13T14:21:30+5:30

Gautami Patil : गौतमी पाटील हिचा काही दिवसांपूर्वी कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल केला होता.

Gautami Patil Video : While talking about the video of changing clothes, Gautami Patil burst into tears, said - 'In his house...' | Gautami Patil Video : कपडे बदलतानाच्या व्हिडीओवर बोलताना गौतमी पाटीलला कोसळलं रडू, म्हणाली - 'त्याच्या घरात...'

Gautami Patil Video : कपडे बदलतानाच्या व्हिडीओवर बोलताना गौतमी पाटीलला कोसळलं रडू, म्हणाली - 'त्याच्या घरात...'

googlenewsNext

सोशल मीडिया सेन्सेशन आणि डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सातत्याने चर्चेत येत असते. तिने तिच्या नृत्याने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. दिवसेंदिवस गौतमीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. तसेच तिच्या डान्सचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बऱ्याच कार्यक्रमानिमित्त गौतमीचे डान्स शो आयोजित केले जातात. तिच्या कार्यक्रमाला असंख्य चाहते गर्दी करत असतात. तिच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातल्याचे वृत्तदेखील समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर आता तिची आणखी एक प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यात बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत आहे.  

गौतमी पाटील हिचा काही दिवसांपूर्वी कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल केला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. तेव्हापासून ती व्हॅनिटी व्हॅन वापरत असल्याचे सांगितले होते.

नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ती मुलाखत देताना दिसत आहे. यावेळी तिने तिच्या सोबत घडलेल्या या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, खूप गोष्टींचा सामना केला आहे. याबद्दल सांगू शकत नाही. जे कुणी ही व्हिडीओ काढला. त्याच्या घरात आई बहिणी नसतील वाटतं. तो एकटाच जन्माला आला असेल. कुठून जन्माला आला असेल माहित नाही. म्हणून त्याने हा कांड केला असेल. 


 
या व्हिडीओत पाहायला मिळतंय की बोलताना गौतमीला रडू कोसळलं आहे. मात्र तिचे चाहते हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, अरे गौतमी सोड आता ते..झाले ते झाले..भेटला की बघू आपण त्याला. 

Web Title: Gautami Patil Video : While talking about the video of changing clothes, Gautami Patil burst into tears, said - 'In his house...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.