'गेला माधव कुणीकडे' नाटकाचे दिग्दर्शक राजीव शिंदे यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 08:59 AM2024-04-11T08:59:45+5:302024-04-11T09:00:50+5:30
राजीव शिंदे यांचं बुधवारी दिर्घ आजाराने निधन झालं आहे.
'गेला माधव कुणीकडे' नाटकाचे दिग्दर्शक राजीव शिंदे यांचं बुधवारी दिर्घ आजाराने निधन झालं आहे. अचानक राजीव शिंदे यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. राजीव शिंदे यांच्या निधनानंतर सोलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
अभिनेते प्रशांत दामले यांनी शिंदे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजीव शिंदे हे गोव्यातील चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील नवीन नाव नाही. राजीव शिंदे हे उत्कटतेचे आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहेत आणि ते गोव्यातील चित्रपट आणि नाटक उद्योगातील खरे ट्रेंडसेटर आहेत. मुंबई चित्रपटसृष्टीतील उपलब्ध संधी असूनही त्यांनी गोव्यात राहणे पसंत केले.
राजीव शिंदे यांनी “गेला माधव कुणाकडे” आणि “थोडासा लॉजिक थोडासा मॅजिक” या मराठी नाटकांचे दिग्दर्शन केलं. "थोडासा लॉजिक थोडासा मॅजिक" या नाटकासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा पुरस्कार जिंकला. शिंदे यांनी ‘देखनी दुराई’ आणि ‘के सेरा सेरा’ या कोकणी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. "देखनी दुराई" हा त्यांचा पहिला कोंकणी चित्रपट होता, ज्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.