Genelia Deshmukh : “तो ऐनवेळी सोडून गेला, मी तणावात होते...” , जिनिलियाने सांगितली ‘वेड’च्या पडद्यामागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:22 PM2023-01-12T18:22:01+5:302023-01-12T18:22:57+5:30

Riteish Deshmukh, Genelia Deshmukh, Ved Marathi Movie : ‘वेड’ हा रितेशचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. जिनिलियाचाही हा पहिला मराठी सिनेमा.  सुरूवातीला मनात धाकधूक असणारचं. पण निश्चय मात्र पक्का होता...

Genelia Deshmukh Talk About Riteish Deshmukh And Her Marathi Movie Ved | Genelia Deshmukh : “तो ऐनवेळी सोडून गेला, मी तणावात होते...” , जिनिलियाने सांगितली ‘वेड’च्या पडद्यामागची स्टोरी

Genelia Deshmukh : “तो ऐनवेळी सोडून गेला, मी तणावात होते...” , जिनिलियाने सांगितली ‘वेड’च्या पडद्यामागची स्टोरी

googlenewsNext

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखच्या ( Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved Marathi Movie ) हा सिनेमा रिलीज होऊन १३ दिवस उलटले. पण या चित्रपटाची क्रेझ अद्यापही संपलेली नाही. दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा गर्दी खेचतोय. हा रितेशचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. जिनिलियाचाही हा पहिला मराठी सिनेमा.  सुरूवातीला मनात धाकधूक असणारचं. पण निश्चय मात्र पक्का होता. त्यामुळे ‘वेड’ बनवताना काही अडचणी आल्यात, मात्र रितेश व जिनिलिया दोघांनीही शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं.

हा सिनेमा करायचाच, हे रितेशने ठरवलं होतं. पण आधी म्हटल्याप्रमाणे सुरूवातीला अनेक अडचणी आल्या. अलीकडे ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द जिनिलियाने याबाबत खुलासा केला. 

ती म्हणाली, “आम्ही ‘वेड’चं काम करणं सुरू केलं तेव्हा रितेशचा सिनेमॅटोग्राफर आधीच ठरलेला होता. त्यामुळे तो काहीसा आश्वस्त होता. मात्र चित्रपटाच्या चित्रीकरणला तीन आठवडेच बाकी असतानाच तो सिनेमॅटोग्राफर सिनेमा सोडून गेला. काही वैयक्तिक कारणामुळे त्याने चित्रपट सोडला. चित्रपटाचा महत्त्वाचा आधाराच निघून गेला हाेता. त्यामुळे पुढचं काम कठीण होतं. मी तर तणावात होते. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा होता, मी सुद्धा प्रथमच मराठीत काम करत होते. त्यात सिनेमॅटोग्राफरने सिनेमा सोडल्यामुळे मला टेन्शन आलं होतं. अशावेळी रितेशने नवोदित सिनेमॅटोग्राफरची निवड केली. मला कळत नव्हतं की नेमकं काय करायचं? तुम्हीपण नवीन, सिनेमॅटोग्राफर पण नवीनच. त्यात माझाही पहिलाच मराठी चित्रपट, आपलं कसं होणार, असं मी रितेशला म्हणाले सुद्धा. पण रितेशला कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड करायची नव्हती. मी तणावात होते. पण रितेशचा निर्धार पक्का होता. रितेशचा निर्णय बरोबर तर आहे ना हा प्रश्न मला छळायचा. पण अखेर रितेशने करून दाखवलं..” 

रितेशने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. लवकरच हा सिनेमा ४० कोटींचा टप्पा गाठणार आहे. रितेशने या चित्रपटावर सुमारे १६ कोटी खर्च केलेत. रितेशने मधल्या काळात दोन तीन सिनेमे केलेत आणि यातून मिळालेला सर्व पैसा 'वेड'वर खर्च केला. पण आनंदाची बाब म्हणजे, हा सगळा पैसा आता वसूल झाला आहे. १३ दिवसांत चित्रपटाने दुप्पट कमाई केली आहे.

Web Title: Genelia Deshmukh Talk About Riteish Deshmukh And Her Marathi Movie Ved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.