जर्मन नाटकाने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 03:42 PM2016-12-15T15:42:57+5:302016-12-15T15:42:57+5:30

तेजल क्रिएशन्स तर्फे आयोजित आणि मिडासच्या सहयोगाने मिडास ट्रॉफी या इंग्रजी व परदेशी भाषांमधील एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच ...

German play spoiled | जर्मन नाटकाने मारली बाजी

जर्मन नाटकाने मारली बाजी

googlenewsNext
जल क्रिएशन्स तर्फे आयोजित आणि मिडासच्या सहयोगाने मिडास ट्रॉफी या इंग्रजी व परदेशी भाषांमधील एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कोनेक्सिऑन लिंग्युइस्टिक तर्फे लिओन्हार्ड थोमा यांच्या लघुकथेवर आधारित उद्धव गोडबोले लिखित जर्मन नाटक 'देर क्लारीनेटं स्पिलर' या नाटकाला पहिले पारितोषिक मिळाले. तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठच्या स्वप्नील पंडित लिखित 'कुतोतेन' या जपानी नाटकाला दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिटयूट ऑफ सिंबायोसिस (इएलटीआयएस) च्या भक्तिप्रसाद देशमाने लिखित इंग्लिश नाटक 'अनीमन' यांनी पटकाविला.

सर्वोत्कृष्ट लेखक स्वप्निल पंडित (कुतोतेन -जपानी नाटक), सर्वोत्कृष्ट अ‍ॅडॅप्टेशन उध्दव गोडबोले (देर क्लारीनेटं स्पिलर - जर्मन नाटक),सर्वोत्कृष्ट सेट प्रसन्न हरन्नखेडकर (देर क्लारीनेटं स्पिलर -जर्मन नाटक),सर्वोत्कृष्ट संगीत अंकिता मोडक (कुतोतेन -जपानी नाटक),सर्वोत्कृष्ट अभिनेता वामन काळे (देर क्लारीनेटं स्पिलर -जर्मन नाटक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ज्ञानदा कुलकर्णी (कुतोतेन -जपानी नाटक),सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अर्चना गोगटे (देर क्लारीनेटं स्पिलर -जर्मन नाटक) आणि सर्वोत्कृष्ट उच्चारण हमता (इंग्लिश नाटक अनीमन)यांना विजेतेपद मिळाले.

अंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ बहुभाषी आणि लँग्वेज सर्व्हिसेस ब्युरोच्या संस्थापिका माधुरी दातार व इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च,इंडिया चे संस्थापक अध्यक्ष आणि इंडियन सेन्टर ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटचे सरचिटणीस प्रसाद वनारसे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 

या स्पर्धेचे परीक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातील जर्मन भाषा प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.सुनंदा महाजन, टॅक्स कन्सल्टंट व रंगकर्मी अमित वझे, फिडेलटेक कंपनीच्या एचआर विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक तादाहिरो योशिदा आणि स्कूल ऑफ लॅग्वेंजेसचे संचालक श्रीरंग बापट यांनी केले आहे.

Web Title: German play spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.