'रावरंभा' चित्रपटात गिरीश कुलकर्णी,ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 04:05 PM2021-11-09T16:05:01+5:302021-11-09T16:05:27+5:30

गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यांनी या पूर्वी देऊळ, फास्टर फेणे अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Girish Kulkarni, Om Bhutkar to star in historical film Ravrambha | 'रावरंभा' चित्रपटात गिरीश कुलकर्णी,ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र झळकणार

'रावरंभा' चित्रपटात गिरीश कुलकर्णी,ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र झळकणार

googlenewsNext

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर 'रावरंभा' या आगामी ऐतिहासिक चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. अभिनेता ओम भूतकर "राव" ही भूमिका साकारत असून "रंभा" ची भूमिका अभिनेत्री मोनालिसा बागल साकारणार आहे . तर अभिनेते गिरीश कुलकर्णी कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे. 

 बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' हा चित्रपट वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.डिसेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 

इतिहासाच्या पानांमध्ये 'रावरंभा' ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच "रावरंभा" या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यांनी या पूर्वी देऊळ, फास्टर फेणे अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनीही आपल्या कसदार अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र रावरंभा हा या दोघांचाही पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामुळे या दोन मातब्बर अभिनेत्यांना ऐतिहासिक चित्रपटात एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 


 

Web Title: Girish Kulkarni, Om Bhutkar to star in historical film Ravrambha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.