"बेधडक" चित्रपटातून गिरीश टावरेचे अभिनयात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 05:36 AM2018-05-29T05:36:07+5:302018-05-29T11:06:07+5:30

सध्या चर्चा आहे ती बेधडक या चित्रपटाची... बॉक्सिंगवर आधारित असलेल्या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाच्या ट्रेलरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, ...

Girish Taware's introduction to the film "Bihadak" | "बेधडक" चित्रपटातून गिरीश टावरेचे अभिनयात पदार्पण

"बेधडक" चित्रपटातून गिरीश टावरेचे अभिनयात पदार्पण

googlenewsNext
्या चर्चा आहे ती बेधडक या चित्रपटाची... बॉक्सिंगवर आधारित असलेल्या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाच्या ट्रेलरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, या चित्रपटाचं आकर्षण ठरलाय अभिनेता गिरीश टावरे... गिरीश या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होतोय. 

राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सुराज्य असे उत्तमोत्तम चित्रपट केलेल्या संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 

पदार्पणाविषयी गिरीश म्हणाला, 'बेधडक हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी एक चॅलेंज होतं. स्पोर्ट्स फिल्म करणं खूप अवघड असतं. त्यात अभिनेता म्हणून मानसिक आणि शारीरिक आव्हान असतं. मात्र,  दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी माझ्याकडून काम करून घेतलं. अशोक समर्थ, गणेश यादव यांच्यासारख्या अभिनेत्यांकडून खूप शिकायला मिळालं. माझ्या पहिल्याच चित्रपटाने मला खूप आनंददायी अनुभव दिला.' गिरीशची मेहनत आणि संतोष मांजरेकर यांच्या दिग्दर्शनासाठी "बेधडक" नक्कीच पहायला हवा. 

बेधडक हा बॉक्सिंगवरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. उत्तम फिजिक असलेल्या नव्या अभिनेत्याचे या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या  काळात एक दमदार आणि पुरेपूर मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल', असे निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी सांगितले. गिरीश टावरेचे अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मंगेश कांगणे, गोविंद टावरे आणि प्रवीण बांदकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रवीण बांदकर यांचे संगीत लाभले असून आदर्श शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

Web Title: Girish Taware's introduction to the film "Bihadak"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.