"मुलींना लग्न करायचं नाहीये, कारण...", उशीरा लग्न करण्याच्या संस्कृतीवर स्पष्टच बोलली तेजश्री प्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:43 IST2025-03-11T17:43:03+5:302025-03-11T17:43:33+5:30
Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न संस्थेवर भाष्य केले आहे.

"मुलींना लग्न करायचं नाहीये, कारण...", उशीरा लग्न करण्याच्या संस्कृतीवर स्पष्टच बोलली तेजश्री प्रधान
अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिने मालिका, नाटक आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटची ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काम करताना दिसत होती. मात्र अचानक तिने मालिकेतून एक्झिट घेतली. यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. याशिवाय ती 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमातही झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकमत फिल्मीला तिने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने लग्नसंस्थेवर भाष्य केले होते. यावेळी तिने हल्ली उशीरा लग्न करण्याकडे जास्त कल असलेला पाहायला मिळतो, यावर आपलं मत मांडलं आहे.
तेजश्री प्रधानने म्हटले की, ८० ते ९० टक्के मुली या ज्या या निर्णयावर पोहोचल्यात त्या कदाचित ना लग्न करायचंय या विचारामध्ये असताना ज्या गोष्टी त्यांच्यासाठी एखाद्या मुलाने कराव्यात असं वाटल्यानंतर तो मुलगा त्यांच्यासाठी त्या गोष्टी करायला नाहीये आणि मग आपण त्या स्वतःच स्वतः करून टाकूया अशा नोटवर गेल्यावर त्यांना आता कदाचित असं वाटायला लागलं असेल की अरे आपण सगळंच मॅनेज करतोय याच्याशिवाय. म्हणजे उदाहरणार्थ अरे यार माझी कलिग तिला घ्यायला तिचा बॉयफ्रेंड आला होता. तिचा नवरा आला होता. यार आणि तू एकटीच चाललीय. त्या सगळ्यातून गेल्यानंतर म्हणजे हे असं माझं खूप मला खूप वाटतं असं कारण अर्थात आपण एका वयाच्या ग्रुपच्या जवळपास असल्यावर आपले मित्र-मैत्रिणी असतात.
आपण आपल्या मैत्रिणींशी बोलत असतो किंवा आपल्या ओळखीत कोणाचं तरी काहीतरी ऐकत असतो. त्या सगळ्या ऐकण्यातनं मला असं वाटतंय की हे लग्न करायचं नाहीये हे थोडसं द्राक्ष आंबट झाल्यासारखं झालंय का? की ते होत नाहीये, याचं दुःख करण्यापेक्षा मला नकोच ही गोष्ट असं सांगून मोकळे होऊया आणि याच्या पलीकडे ज्या १०% उरलेल्या २०% व्यक्ती आहेत त्यात मुलं आणि मुली दोघेही येतात ज्यांना खरंच नाही आणि जे तर आपल्या आई-वडिलांच्या जनरेशपासून आणि त्यांच्याही आधीच्या जनरेशनपासून होतीच माणसं की ज्यांचं ठाम होतं मला नाही अडकायचंय त्या जबाबदाऱ्यांमध्ये तर अशी ती माणसं आहेत. त्यामागची कारण त्यांची त्यांची काही असू शकतात, असे ती म्हणाली.