'तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही...', तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:01 PM2023-06-14T19:01:09+5:302023-06-14T19:01:25+5:30

Tejaswini Pandit And Raj Thackeray: अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही राज ठाकरे यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'God doesn't make people like you anymore...', Tejaswini Pandit wishes Raj Thackeray on his birthday | 'तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही...', तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही...', तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

googlenewsNext

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी झाली आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर भेटण्यासाठी आले आहेत. राज्यभरातून त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिनेही राज ठाकरे यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, आदरणीय राजसाहेब ठाकरे, २० वर्ष झाली आपल्या परिचयाला ! पण संवाद कदाचित हल्लीच झाला तुमचं खुप कौतुक वाटतं मला... इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व... राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, common sense आणि मुख्‍य म्‍हणजे सार्वभौम आणि way ahead of time Vision असलेला एकमेव नेता ! स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात...इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत... राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast life मध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात आणि आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलंत!हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात ?

तुमच्‍या जाणिवा अजूनही जिवंत आहेत !

तिने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की,राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे...कारण कर नाही त्याला डर कशाला ! मुख्‍य म्‍हणजे तुमच्‍या जाणिवा अजूनही जिवंत आहेत !

अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं

तुमच्‍या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे !! तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्‍वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्‍यावर बरसत राहो. कोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Web Title: 'God doesn't make people like you anymore...', Tejaswini Pandit wishes Raj Thackeray on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.