'देवानं सगळं काही दिलं पण...', प्रिया बापटचा व्हिडीओ आला चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 10:38 IST2022-07-14T10:37:41+5:302022-07-14T10:38:19+5:30
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

'देवानं सगळं काही दिलं पण...', प्रिया बापटचा व्हिडीओ आला चर्चेत
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सातत्याने चर्चेत येत असते. तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. प्रिया अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. आता पुन्हा ती सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओत ती तक्रार करताना दिसते आहे.
प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रिया बॅगेत सामान शोधताना दिसत आहे आणि सांगतेय की, देवाने दिलेलं सगळं माझ्याकडे आहे…. पण… ते ठेवलंय कुठे हेच माझ्या लक्षात नाहीये. प्रियाने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओ पाहून चाहत्यांना हसू आवरणे कठीण झाले आहे. या व्हिडीओवर तिचा नवरा उमेश कामत (Umesh Kamat) ने देखील मजेशीर कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, मी तर घरी आहे प्रिया. त्याच्या या कमेंटवर चाहत्यांनी त्याला दाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रिया बापट शेवटची २०१८ साली आम्ही दोघी चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. लवकरच ती ‘विस्फोट’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियासोबत फरदीन खान आणि रितेश देशमुख दिसणार आहेत.