'Home Sweet Home' मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 05:39 PM2018-09-28T17:39:29+5:302018-09-28T17:41:20+5:30

फ्रेम्स प्रोडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोअॅक्टिव्ह प्रस्तुत 'होम स्वीट होम' हा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

Good chemistry of Mohan Joshi and Reema | 'Home Sweet Home' मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री

'Home Sweet Home' मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्देमोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री


फ्रेम्स प्रोडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोअॅक्टिव्ह प्रस्तुत 'होम स्वीट होम' हा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमिस्ट्री बघायला मिळते. अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या 'होम स्वीट होम'मध्ये चित्रपटात ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. रीमा आणि मोहन जोशी यांच्यातील आंबट - गोड नाते उलगडताना अनेक प्रसंगाशी प्रेक्षक स्वतःला कनेक्ट करतात. या दाम्पत्यामधील निखळ विनोदी किस्से मनाला भावतात. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. गायक अजय गोगावले यांचे 'ईकडून तिकडे' आणि सचिन पिळगावकर यांच्या आवाजातील ‘हाय काय, नाय काय’ ही गाणी मनाला भिडतात. आयुष्यात आपल्या घराचं स्थान काय असते हे विषद करताना जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा अत्यंत हटके असा होम स्वीट होम हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
'होम स्वीट होम'ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. 

Web Title: Good chemistry of Mohan Joshi and Reema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.