अजय गोगावलेच्या फॅन्ससाठी गुड न्यूज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 05:51 AM2017-09-18T05:51:41+5:302017-09-18T11:23:22+5:30
सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांच्या पहाडी आवाजाने लवकरच ‘वणवा’ पेटणार आहे. अहमदनगरचा तरूण दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे ...
स प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांच्या पहाडी आवाजाने लवकरच ‘वणवा’ पेटणार आहे. अहमदनगरचा तरूण दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित ‘घुमा’ या चित्रपटासाठी ‘तुझ्या नजरेच्या ठिणगीने वणवा पेटला’ हे विशेष गाणे तयार करण्यात आले आहे. गीतकार गुरू ठाकूर यांचे शब्द आणि संगीतकार जसराज-हृषिकेश-सौरभ यांचे संगीत लाभलेल्या या वणव्याचा उद्यापासून भडका उडणार आहे. गीतकार गुरू ठाकूर आणि संगीतकार जसराज जोशी यांनी जेव्हा हे गीत अजय गोगावले यांना ऐकवले, तेव्हा अजय या गीताच्या प्रेमातच पडले. “हे गाणं मीच गाणार!” असे त्यांनी गुरू आणि जसराज यांना सांगितले.
ग्रामीण भागातून येणारे कलाकार आणि तेथील समस्येवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींप्रती अजय-अतुल यांना विशेष जिव्हाळा आहे, हे याआधीही दिसून आले आहे. दिग्दर्शक महेश काळे हा नागराज मंजुळे आणि भाऊराव खऱ्हाडे यांच्याच अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरील वास्तववादी चित्रण असलेल्या ‘घुमा’ला सर्वच फिल्म फेस्टिव्हल्समध्ये पुरस्कार मिळाल्याने गायक-संगीतकार अजय गोगावले यांनी एक प्रोत्साहन म्हणून हे गीत गायले आहे. गावरान ठसक्यातील या गाण्याला अजय यांचा पहाडी आवाज लाभल्याने हा वणवा यंदाच्या नवरात्रीत महाराष्ट्रभर धुमाकुळ घालणार यात शंका नाही. उद्यापासून झी म्युझिकच्या माध्यमातून या वणव्याचे लोण महाराष्ट्रभर पसरणार आहे. २९ सप्टेंबर पासून घुमा हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.
सध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालताना दिसत आहे. आर्थिक परिस्थिती असो या नसो आपली मुलं ही इंग्रजी शाळेतच शिकली पाहिजे अशी हल्लीच्या पालकांची जिद्द असते. पालक स्वत:ची आर्थिक परिस्थिती नसली तरी उसने पैसे घेऊन मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात, यावरच भाष्य करणारा 'घुमा' हा चित्रपट आहे.
पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक मराठी चित्रपटांमध्ये 'घुमा' प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानिमित चित्रपटाचे दिग्दर्शक महेश काळे, सहाय्यक दिग्दर्शक अविनाश मकासरे आणि चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे शरद जाधव यांनी या चित्रपटाविषयी संवाद साधून या चित्रपटाविषयी उपस्थितांना माहिती दिली होती.
Also Read : All is Well अजय गोगावले यांना हृयविकाराचा झटका नाही