नेहा पेंडसेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार OTTवर पदार्पण, जाणून घ्या डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:22 IST2024-02-27T16:22:11+5:302024-02-27T16:22:40+5:30
मराठी चित्रपटांसोबतच हिंदी कलाविश्वात सक्रिय असलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) मागील बऱ्याच वर्षांपासून हिंदी टेलिव्हिजन जगतात रमली आहे.

नेहा पेंडसेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार OTTवर पदार्पण, जाणून घ्या डिटेल्स
मराठी चित्रपटांसोबतच हिंदी कलाविश्वात सक्रिय असलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) मागील बऱ्याच वर्षांपासून हिंदी टेलिव्हिजन जगतात रमली आहे. 'मे आय कम इन मॅडम?' असं म्हणत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी नेहा 'भाभी जी घर पर है' मालिकेमधल्या तिच्या भूमिकेसाठीही लोकप्रिय आहे. इतर कलाकारांप्रमाणे नेहा पेंडसे ओटीटी माध्यमात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.
अनोख्या फॅशन शैलीसाठी कायम चर्चेत राहणाऱ्या नेहालाही इतर कलाकारांप्रमाणे डिजिटल विश्वाची ओढ लागली आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली नेहा लवकरच डिजिटल विश्वात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ती नेमकी कोणत्या वेब सिरीजद्वारे डिजिटलवर एन्ट्री करणार हे गुपित मात्र सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. लवकरच यावरून पडदा उठण्याची आशा आहे.
वर्कफ्रंट...
नेहा पेंडसेने तिच्या करिअरमध्ये केवळ हिंदीच नाही तर मराठी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला आहे. पण सगळ्यात जास्त लोकप्रिय झाली होती ती संजना हितेशीच्या भूमिकेतून जी तिने 'मे आय कम इन मॅडम?' मध्ये साकारली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या परत भेटीला आली असून त्यात पाहायला मिळत आहे. नेहाने प्यार कोई खेल नहीं या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर देवदास, दाग: द फायर या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.