झाला बोभाटा टीमची लोकमत आॅफीसला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 02:59 PM2017-01-05T14:59:50+5:302017-01-05T15:00:34+5:30

     झाला बोभाटा हा चित्रपट एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या ...

Gopal Bofota team visit Loksat Aafia | झाला बोभाटा टीमची लोकमत आॅफीसला भेट

झाला बोभाटा टीमची लोकमत आॅफीसला भेट

googlenewsNext
 
 झाला बोभाटा हा चित्रपट एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी तर अग्रेसरच म्हणा. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी. या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गावकरी पुन्हा एकत्र येतात, नेमकी काय भानगड आहे हे प्रेक्षकांना पाहण्यासाठी ६ जानेवारीला प्रदर्शित झालेला झाला बोभाटा हा चित्रपट पाहावा लागणार असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे याने लोकमत आॅफिसमध्ये सांगितले. यावेळी निर्माते साईनाथ राजाध्यक्ष, महेंद्रनाथ, दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, मोनालिसा बागल, मयुरेश पेग, संग्राम साळवी, कमलेश सावंत, दिपाली अंबिकार हे सर्व कलाकार यावेळी उपस्थित होते. 
       
                दिलीप प्रभावळकर सांगतात, या चित्रपटात प्रेक्षकांना मी हटक्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. खूप मजेशीर माझा अभिनय प्रेक्षकांना दिसणार आहे. तसेच एक वेगळया विषयावर हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच एक चांगला विषय या चित्रपटातून पाहायला मिळेल यात शंका नाही.
           
                या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात मला सर्वच कलाकारांकडून खूप शिकायला मिळाले. त्याचप्रमाणे दिग्दर्शक अनुप यांच्याकडूनदेखील छान मार्गदर्शन मिळाले. त्यांनी मला खूप सांभाळून घेतले असल्याचे अभिनेत्री मोनालिसा बागल हिने यावेळी सांगितले.

             मयूरेश पेम म्हणाला, माझा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे मीदेखील खूप उत्सुक आहे. माझी या चित्रपटातील भूमिका रोमँण्टिक आहे. माझी ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. या चित्रपटातील कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळाले. नवोदित असलो तरी सगळयांनी खूप सांभाळून घेतले आहे. सेटवर आमची एक फॅमिली तयार झाली आहे. 

         संजय खापरे,  तेजा देवकर, रोहित चव्हाण या कलाकारांचादेखील या चित्रपटात समावेश आहे. किंग क्रिएशन आणि डीजी टेक्नो इंटरप्राईझेस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे.














 

Web Title: Gopal Bofota team visit Loksat Aafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.