‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 09:33 AM2018-07-03T09:33:25+5:302018-07-03T09:34:58+5:30

कुणाल-करण लिखित तीन गाणी या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी स्वरबद्ध आणि कुणाल-करण यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

Great music publishing ceremony of 'Fandi' movie | ‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा

‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा

googlenewsNext

असंख्य मराठी चित्रपटांतून अनिष्ट रूढी परंपरा व अपप्रवृत्तींवर कडाडून  टिका करण्यात आली आहे. अशाच एका गोष्टीचा वेध घेत, राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाची कथा ‘फांदी’ या आगामी मराठी चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. ‘ध्वज क्रिएशनची’ प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला.  कुणाल-करण लिखित तीन गाणी या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी स्वरबद्ध आणि कुणाल-करण यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे, कुणाल विभुते, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. सायली शशिकांत पाटणकर प्रस्तुतकर्त्या असून राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अजित साबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण संजय बापू थोरात तर संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश सरवणकर यांचे आहे. भूषण आंगणे, मृणाली साबळे, विठोबा तेजस, अमोल देसाई, सचिन गायकवाड, जितेंद्र जे.बांभानिया, अनिल शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. २० जुलैला ‘फांदी’ प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Great music publishing ceremony of 'Fandi' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.