'गुलाबी साडी' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपचा शेअर केला फोटो
By तेजल गावडे | Updated: March 17, 2025 13:18 IST2025-03-17T13:17:35+5:302025-03-17T13:18:39+5:30
Prajakta Ghag: 'गुलाबी साडी' हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून प्राजक्ता घाग घराघरात पोहचली. अभिनेत्रीने नुकतेच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे

'गुलाबी साडी' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपचा शेअर केला फोटो
संजू राठोड(Sanju Rathod)च्या गुलाबी साडी गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. गुलाबी साडी या गाण्यावर बॉलिवूडच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते अगदी आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत अनेक जण थिरकताना दिसले. गुलाबी साडी हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून प्राजक्ता घाग (Prajakta Ghag) घराघरात पोहचली. अभिनेत्रीने नुकतेच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे. तिने बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता घागने इंस्टाग्रामवर चाहत्यांना फोटो शेअर करत गुड न्यूज दिली आहे. प्राजक्ताने ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बेबी बंप दिसतो आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, मला आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा अभिमान आहे, पण आई असण्यापेक्षा दुसरे काहीही नाही. तिच्या या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
गुलाबी साडीव्यतिरिक्त प्राजक्ताने नऊवारी साडी पाहिजे आणि डिंपल या ट्रेंडिंग गाण्यांमध्ये काम केले आहे. प्राजक्ताच्या नवऱ्याचे नाव रोहित बोराडे आहे. रोहित आणि प्राजक्ताचं लव्ह मॅरेज आहे. अनेक वर्षांपासून रोहित आणि प्राजक्ता रिलेशनशिपमध्ये होते. तिचा नवरा रोहित हा फिटनेस ट्रेनर आहे. आता ते लवकरच पालक होणार आहेत.