तुम्ही कधी पल्लवी जोशीच्या बहिणीला पाहिलंत? मराठी सिनेइंडस्ट्रीताल या प्रसिद्ध अभिनेत्याची आहे ती पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:00 AM2022-03-12T07:00:00+5:302022-03-12T07:00:02+5:30
पल्लवी यांनी आज तिच्या अभिनयाने छोट्या पडद्यावर तिची एक खास जागा निर्माण केली आहे.पल्लवीप्रमाणेच तिची बहीण देखील एक अभिनेत्री आहेत.
पल्लवी जोशी यांनी आरोहण, अल्पविराम, जुस्तजू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आदमी सडक का डाकू, डाकू और महात्मा यांसारख्या चित्रपटात त्या बालकलाकाराच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री पल्लवी जोशीच्या कुटुंबाविषयी सांगणार आहोत.
पल्लवी यांनी आज तिच्या अभिनयाने छोट्या पडद्यावर तिची एक खास जागा निर्माण केली आहे.पल्लवीप्रमाणेच त्यांची बहीण पद्मश्री जोशीदेखील एक अभिनेत्री आहेत. पल्लवी यांच्या बहिणीने नणंद भावजय या चित्रपटात काम केले होते. 'चंपा चमेली की जाई अबोली' हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणं विशेष गाजले होते. पोरीची धमाल बापाची कमल, नवलकथा या चित्रपटात त्यांनी काम केलं. पद्मश्री जोशी यांचं लग्न मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्यासोबत झालं आहे. विजय कदम यांची सही दे सही, टूर टूर, पप्पा सांगा कुणाचे ही नाटकं गाजली. आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी मराठी सिनेसृष्टीत निर्माण केला आहे. अनेकवेळा पद्मश्री, विजय कदम आणि पल्लवी जोशी यांना सार्वजनिक स्थळी एकत्र पाहाण्यात येते.
पल्लवी यांचं कुटुंब सिनेसृष्टीशी निगडीत आहे. त्यांच्या आधी त्यांच्या भावाने चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला आहे. मास्टर अलंकारने दीवार या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर अलंकारला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्या काळातील सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असलेला तो बालकलाकार होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याने सीता और गीता, शोले, धडकन, ड्रीमगर्ल अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे.