'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली...' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, झालं व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 14:06 IST2022-12-20T14:05:44+5:302022-12-20T14:06:46+5:30
Pushpa Movie : पुष्पा या ब्लॉकबस्टर दाक्षिणात्य सिनेमातील गाणी आज ही मोठ्या प्रमाणात पसंतीस पडत आहे. शिवाय या गाण्याचे विविध भाषांमध्ये व्हर्जंन पाहायला मिळाले आहेत.

'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली...' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, झालं व्हायरल
२०२१ मध्ये अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पाला कोणीही विसरू शकले नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे झेंडे उंचावले, ज्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल. या ब्लॉकबस्टर दाक्षिणात्य सिनेमातील गाणी आज ही मोठ्या प्रमाणात पसंतीस पडत आहे. शिवाय या गाण्याचे विविध भाषांमध्ये व्हर्जंन पाहायला मिळाले आहेत. पण, गायिका रागिणी कवठेकरच्या आवाजातील श्रीवल्ली हे गाणं इतरांपेक्षा जरा उजवं ठरल आहे.
याच कारण म्हणजे, हे गाणं पुष्पा सिनेमातील गाण्याची अधिकृत म्युजिक कंपनी आदित्य म्युजिकने खास मराठीमध्ये सादर केलं आहे. रागिणी कवठेकरच्या ओ अंटावा या मराठी फिमेल व्हर्जन गाण्याची प्रसिद्धी पाहता, श्रीवल्ली देखील प्रसिद्धीचा उच्चांक गाठेल यात शंका नाही.
खरे तर श्रीवल्लीसाठी असलेलं हे गाणं, मराठीमध्ये खुद्द श्रीवल्लीच आपल्या पुष्पासाठी गात आहे, असे दिसून येते. या गाण्याचे शब्दांकन शशांक कोंडविलकर यांनी केलं असून, साऊथ सिनेमातील सुपरहिट गाण्यांसाठी प्रचलित असलेल्या आदित्य म्युजिक यु ट्यूब चॅनलवर हे गाणं अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आले आहे.