हिना पांचाळने "गरम चाय की प्याली हो" गाण्यावर धरला ठेका, डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही म्हणाल WOW
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 15:00 IST2020-11-10T14:56:35+5:302020-11-10T15:00:02+5:30
अन्नु मलिक यांचे सुपरहिट गाणे ''गरम चाय की प्याली हो'' कॅप्शनसह हिनाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हिना पांचाळने "गरम चाय की प्याली हो" गाण्यावर धरला ठेका, डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही म्हणाल WOW
मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलतीच भाव खाऊन गेली होती. बिग बॉसमुळे ख-या अर्थाने हिना चर्चेत आली. त्यातच सोशल मीडियावरील तिच्या नव्या व्हिडिओने रसिकांना अक्षरक्षः वेड लावलं आहे. अन्नु मलिक यांचे सुपरहिट गाणे ''गरम चाय की प्याली हो'' कॅप्शनसह हिनाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात.
या व्हिडिओमध्ये या गाण्यावर थिरकणाऱ्या हिनाच्या अदांचा जलवा पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास हिनाच्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हिना वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत असून अधिक ग्लॅमरस दिसत आहे.
हिनाच्या डान्स स्टेप्स आणि तिचे हावभाव चित्रपटसृष्टीतील दिग्गज डान्सर्सनाही लाजवतील असेच आहेत. हिना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असली तरी तिला डान्सचीह खास आवड आहे. नेहमीच वेगवेगळ्या गाण्यांवर ती तिचे डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.
डान्स हे तिचं पहिलं प्रेम आहे. त्यामुळेच काम म्हणून आणि आवड म्हणून डान्स तिच्यासाठी सर्वस्व आहे. सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. हिनाच्या फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.
हिना पांचाळ ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम करते त्यामुळे तिकडे तिची लोकप्रियता जास्त आहे. पण खास बात म्हणजे हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता असल्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.
हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत.
यामध्ये 'हुक्का', 'मोहल्ला', 'बेबो बेबो', 'राजू ओ राजू', 'बोगन' आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा समावेश होता.