हे माझे चुलत काका आणि आत्या, त्यांना मदत करा...! अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 05:30 PM2020-12-13T17:30:00+5:302020-12-13T17:30:02+5:30

एक पोस्ट व्हायरल झाली आणि मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले अचानक चर्चेत आली.

Help my uncle; Actress Bhargavi Chirmule's Emotional Post | हे माझे चुलत काका आणि आत्या, त्यांना मदत करा...! अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने शेअर केली पोस्ट

हे माझे चुलत काका आणि आत्या, त्यांना मदत करा...! अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने शेअर केली पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देभार्गवीच्या या चुलत काकांचे वय आहे 84 वर्षे आणि त्यांची बहीण  65 वर्षांची. मूकबधीर असलेल्या या बहिणीसोबत हे काका सदाशिव पेठेच्या वाड्यात राहतात.

हे आजोबा आपल्या 65 वर्षीय मूक-बधिर बहिणीसोबत सदाशिव पेठेतील एका वाड्यात रहातात.
उदरनिवार्हासाठी दोघेही बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकतात आणि रोज संध्याकाळी सदाशिव पेठेत एका स्टूलावर सर्व पदार्थ मांडून विकण्याचा प्रयत्न करतात.
पण कोरोना आला आणि सोबत यांच्या आयुष्यात घेऊन आला मोठ्ठे प्रश्नचिन्ह ???

अशी संतोष सुबाळकर यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आणि मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले अचानक चर्चेत आली. कारण काय तर या आजोबांसोबत भार्गवीचे असलेले नाते. होय, उदरनिवार्हासाठी बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकणारे हे आजोबा म्हणजे भार्गवीचे चुलत काका आणि आजोबांची बहीण म्हणजे भार्गवीची आत्या.
आता भार्गवीने चुलत काका व आत्याचा एक फोटो शेअर करत, त्यांना मदत करा, असे आवाहन केले आहे. ‘हे माझे चुलत काका आणि आत्या आहेत.... आम्ही कुटुंबिय सगळे काही ना काही मदत त्या दोघांना करतच असतो. पण शेवटी आत्मनिर्भर स्वभाव आहे त्यांचा, म्हणून माझ्या पुण्यातल्या मित्र मैत्रिणींना मी रिक्वेस्ट करते की, तुमच्यापरिने जी मदत होऊ शकेल त्या वस्तू विकत घेण्याच्या निमित्ताने तेवढी करा.मनापासून आभार, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोरोनाने सगळेच विस्कटले...
भार्गवीच्या या चुलत काकांचे वय आहे 84 वर्षे आणि त्यांची बहीण  65 वर्षांची. मूकबधीर असलेल्या या बहिणीसोबत हे काका सदाशिव पेठेच्या वाड्यात राहतात. कोरोना महामारीआधी हे दोघेही बँकांमध्ये शेव, फरसान विकायचे. मात्र कोरोना आला आणि सगळेच विस्कटले. आजही ते बँकेत शेव-फरसान घेऊन जातात. पण बँकेचे कर्मचारी या काकांना आता आत घेत नाहीत. कारण काय तर काळजी आणि भीतीपोटी. कोरोनाची भीती आणि आजोबांची काळजी.आता हे चिरमुले काका आणि त्यांची बहीण उदबत्ती, वाती, पंचाग घेऊन एका स्टुलावर विकासयला बसतात.

Web Title: Help my uncle; Actress Bhargavi Chirmule's Emotional Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.