बरेच महिने तिचं नाव ठेवलं गेलं नव्हतं, मग डॉक्टरांच्या खोलीत...; हेमांगी कवीच्या बारशाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 02:23 PM2021-12-22T14:23:58+5:302021-12-22T14:24:28+5:30
Hemangi Kavi : मी आईबाबांचे तिसरं अपत्य.. Unplanned Baby!! हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
हेमांगी कवी (Hemangi Kavi ) ही मराठी चित्रपटसृष्टीतील बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. काही दिवसांपूर्वी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टमुळे ती सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली होती. सध्याही तिच्या एका पोस्टची चर्चा आहे. या पोस्टमध्ये हेमांगीनं तिच्या ‘हेमांगी’ या नावाचा अर्थ सांगितला आहे. शिवाय या नामकरणाचा इंटरेस्टिंग किस्साही शेअर केला आहे. साहजिकच हेमांगीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय. पहिला मुलगा, दुसरी मुलगी. हम दो हमारे दो अशी परफेक्ट फॅमिलीची चौकट पूर्ण झालेली असताना ही मला जन्माला यायचंच होतं. खूप प्रयत्न झाले मला थांबवण्याचे पण शेवटी मी आलेच. हट्टीपणा जन्मताच असतो तो असा, अशी सुरूवात करत तिने ही पोस्ट लिहिली आहे.
हेमांगी लिहिते,
हेमांगी म्हणजे स्वर्ण अंगी. हेम म्हणजे सोनं!
मी माझ्या आई बाबांचं तिसरं अपत्य. Unplanned Baby! पहिला मुलगा, दुसरी मुलगी. हम दो हमारे दो अशी perfect family ची चौकट पूर्ण झालेली असताना ही मला जन्माला यायचंच होतं. खूप प्रयत्न झाले मला थांबवण्याचे पण शेवटी मी आलेच. हट्टीपणा जन्मताच असतो तो असा! पण अश्या unplanned, unwanted बेबी च सर्वात जास्त लाडक्या असतात. मी तर प्रचंड लाडकी माझ्या बाबांची!
माझ्या जन्मानंतर बरेच दिवस... मला वाटतं बरेच महिने माझं नाव ठेवलं गेलं नव्हतं! बारसं वगैरेचे लाड आधीच्या 2 अपत्यांच्या बारशात करून झाले होते आणि माझ्या जन्माच्या वेळेस बाबांच्या कंपनीत संप ही चालू होता. खर्च नको म्हणून हौसेला आळा घातला. अर्थात त्यांच्या.. मला काय कळणार होतं? पुढे मोठी झाल्यावर जेव्हा समजलं तेव्हाही वाईट नाही वाटलं उलट बरंच वाटलं... एक नाव ठेवायला कश्याला उगाच एवढा खर्च आणि तामझाम. मोठं होऊन ज्याला त्याला आपलं नाव कमवावच लागतं आणि बाकी दुनिया असतेच की नावं ठेवायला मग त्यासाठी आधीच कश्याला खर्च करायचा?
तर, एक दिवस मला बरं नव्हतं म्हणून माझ्या आईने आमचे family doctor Dr. C.G. Patil यांच्याकडे दाखवायला आणलं. तेव्हा त्यांनी विचारलं काय नाव काय ठेवलं? आई म्हणाली अजून ठेवलं नाहीए. Doctor म्हणाले मग मी सुचवू? आई म्हणाली हो सुचवा की... उलट तुम्हीच ठेवा तिचं नाव. तसं नावरस अक्षर 'ह' आलंय.
लहान बाळांची त्वचा तशी खूप तुकतुकीत असते, माझी जरा जास्तच होती म्हणे, आता आहे त्यापेक्षा आणखी एक दोन shade गडद असली तरी चकचकीत होती, केसांचा रंग ही पिंगट होता.
मला injection टोचून झाल्यावर Doctor म्हणाले...अरे वाह, जरा ही रडली नाही ही मुलगी... solid आहे... 'हेमांगी'... आजपासून हेमांगी नाव हिचं. कळव्यात डॉक्टरांच्या तपासणीच्या एवढूश्या खोलीत, एका tubelight च्या रोषणाईत, आजूबाजूला औषधांच्या सुगंधी वातावरणात, एका हुशार compounder च्या उपस्थितीत, leather cover असलेल्या bed वर मला ठेऊन माझं नाव ठेवलं गेलं. माझं बारसं झालं! 80's मध्ये हे नाव फार म्हणजे फारच दुर्मिळ होतं. या नावाचा अर्थ न कळल्याने आईने विचारलं म्हणजे काय हो? तेव्हा Doctor म्हणाले ... सोनेरी अंगाची... हेमांगी!
आता सोन्याचे किती फायदे हे मी वेगळं सांगायला नको! काय?