'माझी सासू चांगली खमकी होती', पहिल्यांदाच सासुबाईंविषयी व्यक्त झाली हेमांगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:00 PM2023-04-18T15:00:00+5:302023-04-18T15:00:00+5:30

Hemangi kavi: हेमांगीचं करिअर घडत असताना सासूबाईंचं वागणं कसं होतं हे तिने सांगितलं.

hemangi kavi talk about her mother in law support during night shoot | 'माझी सासू चांगली खमकी होती', पहिल्यांदाच सासुबाईंविषयी व्यक्त झाली हेमांगी

'माझी सासू चांगली खमकी होती', पहिल्यांदाच सासुबाईंविषयी व्यक्त झाली हेमांगी

googlenewsNext

समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर उघडपणे भाष्य करणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी हेमांगी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर तिचे विचार मांडते. यात अनेकदा तिला ट्रोलही व्हावं लागतं. मात्र, ट्रोलिंगचा विचार न करता ती थेट तिची मतं मांडत असते. अलिकडेच हेमांगीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या सासुविषयी भाष्य केलं आहे.
 

हेमांगीने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये तिच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य केलं. यात तिने तिच्या सासूबाईंविषयी पहिल्यांदा माहिती दिली. सुनेच्या करिअरमध्ये सासूबाईंनी कशाप्रकारे साथ दिली हे तिने सांगितलं.

'लग्न झाल्यानंतर नेमका कोणत्या गोष्टींमध्ये बदल झाला?' असा प्रश्न हेमांगीला विचारण्यात आला. त्यावर, “मी खरं सांगू का, तर माझ्या आई- वडिलांची पुण्याई की मला असं सासर मिळालं. माझं सासरसुद्धा अगदी टिपिकल मिडल क्लास आहे. त्यात माझी सासू चांगली खमकी होती,” असं हेमांगी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “अनेकदा कसं असतं ना की, घरच्यांना काहीच अडचण नसते. पण हे जे बिल्डिंगमधले किंवा आजूबाजूचे लोक असतात ना त्यांना प्रॉब्लेम असतो की, अरे तुमची सून सकाळी १०- १० वाजेपर्यंत झोपते. तर माझी सासू खमकी, तेव्हा ती म्हणायची की, ती रात्री १२ वाजता शुटिंगवरून येते. मग ती १० वाजेपर्यंत झोपू दे किंवा १२ वाजेपर्यंत झोपू दे, तुम्हाला काय त्रास आहे?

दरम्यान, हेमांगी सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते. अलिकडेच ती लेक माझी दुर्गा या मालिकेत झळकली होती. तसंच तिने ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातही काम केले होते. 

Web Title: hemangi kavi talk about her mother in law support during night shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.