हेमांगी कवीच्या पोस्टनं वेधलं लक्ष; अभिनेता जितेंद्र जोशीचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:27 PM2023-09-01T17:27:00+5:302023-09-01T17:29:10+5:30
मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या अभिनय आणि बिनधास्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. एखाद्या विषयावर तिने घेतलेली भूमिका ती नेमकेपणाने ...
मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या अभिनय आणि बिनधास्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. एखाद्या विषयावर तिने घेतलेली भूमिका ती नेमकेपणाने पटवून देते. त्यामुळे हेमांगी कवी ही सोशल मीडियातही चर्चेत असते. नुकतंच हेमांगीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेता जितेंद्र जोशीचे आभार मानले आहेत.
हेमांगी कवीने पोस्टमध्ये म्हटले की, तुझ्या छानशा आवाजाने नाटकाची सुरवात होते. नाट्यगृहाच्या त्या अंधारात तु तुझ्या आवाजाने प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातोस. तुझ्या बोलण्यात आणि आवाजात वेगळीच जादू आहे जी आम्हां कलाकारांना ही विंगेत प्रवेशासाठी उभे असताना मंत्रमुग्ध करते! तुझ्या आवाजात संतांचा अभंग आहे, नदीचा शांत प्रवाह आहे, बासरीतली सुंदर कंपनं आहेत! डोळे बंद करून ऐकलं की वाटतं आपला आतला आवाज आपल्याशी बोलतोय! आम्ही धान्यस्त होतो आणि Correct note ला नाटक सुरू होतं!
तु तुझा आवाज जन्मवारीच्या announcement साठी दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद! जीतू! आणि ‘गोदवरी’ चित्रपटाला National Award (Best Direction) मिळालं. त्यासाठी तुझे आणि निखिलचे मनःपूर्वक अभिनंदन!, असे हेमांगीने म्हटले आहे.
हेमांगी 'जन्मवारी' या नाटकात मंजी या देहविक्री करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. हे नाटक एका जन्मात आपण जे करतो किंवा आपण जे असतो तसंच पुढच्या जन्मातही असतो का, ते बदलण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीकडे असतं का या विषयावर भाष्य करतं.