हेमांगी झाली फुलराणी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2016 12:52 PM2016-03-06T12:52:25+5:302016-03-06T05:52:25+5:30

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. आधीच्या अभिनेत्रींनी ही ...

Hemangi visited Phulrani | हेमांगी झाली फुलराणी’

हेमांगी झाली फुलराणी’

googlenewsNext
n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. आधीच्या अभिनेत्रींनी ही भूमिका इतकी सुंदर वठवल्यानंतर नव्याने ती साकारणे हे मोठे आव्हानच. सध्याची मल्टीटॅलेंटेड अभिनेत्री हेमांगी कवी ही नवी फुलराणी साकारणार असून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ असं ठसक्यात म्हणत रसिकांची उत्कंठा वाढवायला सज्ज झाली आहे.
पुलंच्या ही ‘फुलराणी’ याआधी भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ उभी केली. हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात आणण्याच काम नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं आहे. या नाटकाच्या संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून तांत्रिक बाबतीत थोडे बदल करण्यात आल्याचे राजेश देशपांडे यांनी सांगतले.
फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी सोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक आहेत. सोबत मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, निरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव, हे कलाकारही यात आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.
 ‘अष्टगंध एंटरटेण्मेंट निर्मित’ ‘एँडोनिस एण्टरप्रायजेस’ प्रकाशित या नाटकाच्या निर्मितीची धुरा धनंजय चाळके यांनी सांभाळली आहे.

Web Title: Hemangi visited Phulrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.