"माफ करा महाराज..आम्ही तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय", हेमंत ढोमेने शेअर केली संतप्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:16 PM2020-08-05T19:16:19+5:302020-08-05T19:16:58+5:30
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमेने 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले 'छत्रपती शिवाजी महाराज' आणि त्यांचे 'गड किल्ले' हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. पण महाराज्यांच्या किल्ल्यांची झालेली दुर्दशा, नागरिकांमध्ये असलेली अनास्था तसेच राजकारण्यांनी सत्तेसाठी महाराजांना एक ब्रॅण्ड म्हणूनच उभे केले आहे. या सर्व विषयांवर 'बघतोस काय मुजरा कर' सिनेमा रसिकांनी रूपेरी पडद्यावर अनुभवलाय.
महाराष्ट्राचं वैभव ढासळताना पाहुन खूप जास्त वाईट वाटतय... माफ करा महाराज... आम्ही तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय... #विजयदुर्ग_किल्ला_वाचवा_अभियानpic.twitter.com/kop3mRZErh
— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) August 4, 2020
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमेने 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन हेमंत ढोमेने केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. पुन्हा एकदा हेंमंत ढोमेने हा मुद्दा निदर्शनास आणून दिला आहे.
कोणत्याही मुद्यावर थेट आणि परखड मत मांडणाऱ्या अभिनेता हेमंत ढोमेने यावर आपली भूमिका मांडलीय. सोशल मीडियावर विजयदुर्ग किल्ल्याचा ढासळलेला भागाचा फोटो शेअर करत त्याने म्हटले की, “महाराष्ट्राचं वैभव ढासळताना पाहुन खूप जास्त वाईट वाटतय… माफ करा महाराज… आम्ही तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय.. असे त्याने म्हटले आहे. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधतात.अगदीच त्याप्रमाणे हेमंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तुर्तास त्याच्या या पोस्टवर चाहते आपल्या प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.