स्मिताच्या विटांनी बांधली घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 09:36 AM2016-06-14T09:36:06+5:302016-06-14T15:06:06+5:30

           वेगवेगळ््या धाटणीचे चित्रपट करणारी अभिनेत्री म्हणुन स्मिता तांबेची आज मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. ...

Homes built by Smita's bricks | स्मिताच्या विटांनी बांधली घरे

स्मिताच्या विटांनी बांधली घरे

googlenewsNext

/>           वेगवेगळ््या धाटणीचे चित्रपट करणारी अभिनेत्री म्हणुन स्मिता तांबेची आज मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. आजपर्यंत तिने अनेक प्रकारच्या व्हर्सटाईल भुमिका साकारल्या असुन आता तर या पठ्ठीने चक्क विट्या तयार केल्या आहेत. हो... हो ., हे खरच आहे. स्मिता तांबेने विटभट्टीवर जाऊन चक्क स्वत:च्या हाताने विटा तयार केल्या. अन एवढेच नाही तर स्मिताने बनविलेल्या या विटांची आज संगमनेरमध्ये घरे आहेत. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्मिताने काय नवीन बिझनेस सुरु केलाय आॅर ती सिनेमांना बाय बाय तर करीत नाही ना. तर असेच काहीच नाहीये. उलट स्मिता एका चित्रपटासाठीच हे सर्व काही करीत आहे. गणवेश नावाच्या आगामी चित्रपटात स्मिता विटभट्टीवर काम करणाºया स्त्रीची भुमिका साकारीत आहे. अन या भुमिकेसाठी ती थेट पोहचली विटभट्टीवर अन पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत विटा तयार करुन हम भी किसीसे कम नही हेच तिने दाखवून दिले आहे. याबद्दल स्मिताने सीएनएक्सला दिलेल्या खास इंटव्हर्युमध्ये सांगितले की, मला जेव्हा गणवेशच्या वर्कशॉपसाठी सकाळी बोलविण्यात आले होते तेव्हा मी पहाटे थंडी वाजू नये म्हणुन स्वेटर, हॅन्डग्लोव्ज, जॅकेट घालुन एकदम पॅक होऊन गेले होते कारण मला थंडी सहन होत नाही. तिथे गेल्यावर मला आमच्या डिरेक्टरने एक साडी आणुन दिली अन सांगितले ही नेस अन आपल्याला आता विटा तयार करायच्यात. मी साडी तर नेसली पण जेव्हा विटा तयार करायला गेले अन त्या मातीत हात घातले तेव्हा माझे हात एकदम गारठले कारण ती माती बर्फासारखी थंड होती. पण माझासमोर एक बाई आली अन तीने दोनी हात त्या मातीत घालुन धपाधप ती विटा करु लागली. बास मला त्या बाईकडे पाहुन खरच इन्सिरेशन मिळाली अन मी सगळ काही विसरुन मस्त विटा तयार केल्या. खरंच, यालाच म्हणतात कामासाठी वाटेल ते.

Web Title: Homes built by Smita's bricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.