'अ होमेज टू अब्बाजी – उस्ताद अल्लारखॉं' सांगीतिक सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 08:47 AM2018-01-23T08:47:06+5:302018-01-23T14:17:06+5:30
तबलानवाज उस्ताद अल्लारखॉं... जगभरातल्या कोट्यवधी संगीतप्रेमींमध्ये `अब्बाजी` म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अवलियाने अनेकांच्या मनांवर अधिराज्य गाजवलेले आहे. या तबलागुरू ...
त लानवाज उस्ताद अल्लारखॉं... जगभरातल्या कोट्यवधी संगीतप्रेमींमध्ये `अब्बाजी` म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अवलियाने अनेकांच्या मनांवर अधिराज्य गाजवलेले आहे. या तबलागुरू आणि प्रेमळ पित्याच्या पहिल्या `बरसी`पासूनच म्हणजे, ३ फेब्रुवारी २००१ पासून `अ होमेज टू अब्बाजी – उस्ताद अल्लारखॉं` हा इव्हेंट सुरू करण्यात आला.
सांगीतिक कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेत हा नेत्रदीपक सोहळा गेली कित्येक वर्षे विशेष दिन म्हणून ओळखला जातो. यंदाचा ३ फेब्रुवारी २०१८ हा दिवसही याला अपवाद राहणार नाही. या दिवशी जगभरातले संगीत कलाकार आपले श्रेष्ठ व देवासमान गुरू आणि तबलानवाज उस्ताद अल्लारखॉं यांना आदरांजली वाहण्यासाठी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
झाकीर हुसेन म्हणाले, ''गेल्या अठरा वर्षांत या कार्यक्रमासाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या अद्वितीय कलावंतांची आम्हाला सांगीतिक व तालबद्ध साथ मिळाली आहे. आम्ही यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो.''
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सहसादरकर्ते पद ताजमहाल टी आणि रिलायन्स फाऊण्डेशनने स्विकारले असून सहप्रायोजकत्व लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा एएमसी लिमिटेडकडे आहे. तर, आर्किड हॉटेलने याची हॉस्पिटॅलिटी भागीदारी स्विकारली आहे.
''अ होमेज टू अब्बाजी – उस्ताद अल्लारखॉं'' हा कार्यक्रम ३ फेब्रुवारी २०१८, शनिवार रोजी मुंबईतल्या श्री षण्मुखानंद चंद्रसेकारेंद्र सरस्वती ऑडिटोरिअम येथे रंगणार असून उस्ताद अल्लारखॉं इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक संस्थेच्या विद्यार्थ्यांसह अनेक ज्येष्ठ कलाकारांची सांगीतिक मैफल झाकीर हुसेन यांनी गुंफली आहे.
या कार्यक्रमाविषयीचे आपले विचार सांगताना झाकीर हुसेन म्हणाले, ``भारतीय आणि पाश्चिमात्य संगिताच्या मिलाफाची बिजे माझ्या कारकीर्दीच्या आधीपासूनच रुजलेली आहेत. फ्युजन संगितावर प्रयोग करणाऱ्या मंडळींमध्ये पं. रवी शंकर आणि माझे वडील उस्ताद अल्लारखॉं यांच्यासह अनेक बॉलीवूड संगीतकारांचा समावेश होता. मी हे संगीत केवळ जगासमोर आणले आहे. मी या माध्यमातून जगापर्यंत हे संगीत पोहोचवले आहे.``