जयपूरमध्ये नेहा पेंडसेचे हॉट फोटोशूट, फोटो पाहून व्हाल खल्लास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 19:34 IST2020-03-20T19:32:51+5:302020-03-20T19:34:42+5:30
नेहाच्या या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

जयपूरमध्ये नेहा पेंडसेचे हॉट फोटोशूट, फोटो पाहून व्हाल खल्लास
मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नुकतेच इतर अभिनेत्रींप्रमाणे नेहानेही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटोंनाही रसिकांची कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केला होता. नववधू अंदाजात नेहा खूप सुंदर दिसली.
याशिवाय तिच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. तिचा असाच एक दुसरा फोटोही समोर आला आहे.
नेहाने नुकतेच जयपूरमध्ये फोटोशूट केले असून यात तिने ब्लू रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोत नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर पाहायला मिळत आहे. नेहाचा हा अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.
नेहा सध्या एका मराठी चित्रपटात काम करते आहे. त्यामुळे ती खूप बिझी आहे. तिने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासोबत तिच्या हनीमून प्लानिंगबद्दल सांगितलं.
नेहा म्हणाली की, मराठी चित्रपटानंतर आणखीन एका प्रोजेक्टचे काम सुरू होणार आहे. त्याचे शूटिंग बाकी आहे. काम संपल्यानंतर हनीमूनला जाणार आहे. हनीमूनसाठी जापानची निवड केली आहे. कामामुळे एप्रिलमध्ये बाहेर जाणार आहे.