Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीने शेअर केलं हॉट अँड बोल्ड फोटोशूट, फोटोची रंगलीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 14:12 IST2021-02-20T14:09:54+5:302021-02-20T14:12:46+5:30
Marathi actress share her bold photoshoot on internet : बोल्ड अँड ग्लॅमरस फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे.

Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीने शेअर केलं हॉट अँड बोल्ड फोटोशूट, फोटोची रंगलीय चर्चा
अभिनेत्री पल्लवी पाटीलने 'क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या असून ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. ए कोण आहे रे तिकडे ?? असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या चाहत्यांकडून होत आहे.
पल्लवी पाटीलने बोल्ड अँड ग्लॅमरस फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
यासोबतच भारतीय पेहरावातील देखील पल्लवीचे फोटो आपल्याला तिच्या इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांची तितकीच पसंती मिळते. पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोलो करतात.