​गावरान आर्चीला जान्हवी कशी साकारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 02:14 PM2016-12-23T14:14:20+5:302016-12-23T14:14:20+5:30

सैराटचे नाव जरी काढले तरी डोळ््या समोर उभए राहतात ते आर्ची आणि परशा. या दोघांशिवाय हा चित्रपट अपूर्णच आहे. ...

How can you tell Gavran Archie? | ​गावरान आर्चीला जान्हवी कशी साकारणार?

​गावरान आर्चीला जान्हवी कशी साकारणार?

googlenewsNext
राटचे नाव जरी काढले तरी डोळ््या समोर उभए राहतात ते आर्ची आणि परशा. या दोघांशिवाय हा चित्रपट अपूर्णच आहे. आर्चीचा रांगडा आणि बिनधास्त अभिनय कायमच प्रेक्षकांच्या मनात राहणार आहे. या चित्रपटाच्या यशानंतर रिंकु राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची रातोरात स्टार झाली. आर्ची हीच रिंकुची खरी ओळख झाली. पण आता त्याच आर्चीच्या रुपात प्रेक्षक श्रीदेवीच्या मुलीली म्हणजेच जाव्हनी कपूरला स्वीकारणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरने सैराट चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये आर्चीच्या भुमिकेद्वारे अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे तर आता सगळ््यांनाच माहित झाले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित आर्ची-परशाच्या 'सैराट'ने सर्वांनाच याड लावले. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलाही याड लावले होते. 'सैराट' सुपर-डुपर हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक निर्माते उत्सुक होते. मात्र, अखेरीस करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने बाजी मारत हे हक्क मिळवले. आता धर्मा प्रोडक्शन आणि झी एकत्रितपणे या चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे कथानक बºयापैंकी 'सैराट'सारखेच राहणार आहे. मात्र संपूर्ण भारतातील प्रेक्षक वगार्ला विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. याच चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वरुण धवनच्या अपोझिट 'शिद्दत' या सिनेमाव्दारे करण जोहर जान्हवीला लॉन्च करणार असल्याची चर्चा याआधी रंगत होती. मात्र आता 'सैराट'च्या रिमेकमध्ये करण जान्हवीलाच घेण्यास उत्सुक असल्याची माहिती धर्मा प्रॉडक्शनकडून मिळाल्यामुळे गावरान आर्चीची सर करणच्या मॉडर्न आर्चीला येते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: How can you tell Gavran Archie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.