किती खोडकर होते तुमचे आवडते कलाकार त्यांच्या लहानपणी. जाणून घ्या आमच्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2016 10:38 AM2016-11-14T10:38:25+5:302016-11-14T10:43:08+5:30

 अशाच काही आठवणी बालदिनाच्या निमित्ताने मराठी कलाकारांनी सीएनएक्ससोबत शेअर केल्या आहेत.  सई ताम्हणकर:  ते दिवस काहीसे वेगळेच असतात. लहानपणी ...

How ruined are your favorite artists in their childhood? Learn with us | किती खोडकर होते तुमचे आवडते कलाकार त्यांच्या लहानपणी. जाणून घ्या आमच्यासोबत

किती खोडकर होते तुमचे आवडते कलाकार त्यांच्या लहानपणी. जाणून घ्या आमच्यासोबत

googlenewsNext
 
शाच काही आठवणी बालदिनाच्या निमित्ताने मराठी कलाकारांनी सीएनएक्ससोबत शेअर केल्या आहेत. 

सई ताम्हणकर:  ते दिवस काहीसे वेगळेच असतात. लहानपणी मी प्रचंड खेळायचे. चमचा लिंबू हा माझा आवडता खेळ. त्याचबरोबर मी ज्यावेळी सीनिअर केजीमध्ये होते. त्यावेळी आई मला शाळेत सोडायला यायची. शाळा लगेच सुटायची म्हणून आई शाळेच्या शेजारील काकूकडे बसायची. त्यावेळी मी वर्गातल्या शिक्षकांना काही ना काही कारणे सांगून वर्गाच्याबाहेर यायचे आणि आई बसली आहे का काकूजवळ हे चेक करायचे. आजही ही गोष्ट आठवली की मलाच माझे फार हसू येते. खरचं ते दिवसच खूप भारी असतात.




अभिजीत खांडकेकर: लहानपणी आपण सगळे टेन्शनमुक्त असतो. लहानपणी मात्र आई वडील कुठे ही चल म्हटले, निघायचो. आता, हेच दिवस मी खूप मिस करतो. त्याचबरोबर लहानपणी मी आणि माझी बहीण आम्ही खूप किडे करायचो. एकदा बर्फच्या ट्रेमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये साखर घातली. ज्यावेळी त्याचा बर्फ तयार झाला त्यावेळी त्याची चव पाहिली तर तो बर्फ थोडा खारट लागला. साखर टाकलेल्या पाण्याचा बर्फ खारट झाला हा नवा शोध लावल्यामुळे मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. पण नंतर कळाले की, त्यामध्ये माझ्या बहिणीने मीठ टाकले होते. आमच्या बहीण भावंडाची ही किडेगिरीवर अजून ही सगळे हसतात. 


अमृता खानविलकर : लहानपणीचे दिवस हे माझ्यासाठी खरचं गोल्डन डेज होते. माझे लहानपण पुण्यात गेले आहे. तिथेच माझ्या डान्समधील करिअरची सुरूवात झाली. सोसायटीतला गणेशोत्सव मी खूप मिस करते. कारण त्या पाच दिवसांत विविध स्पर्धा असायच्या. त्यावेळी खूप धमाल आणि मस्ती करायचो. तसेच गणेशोत्सवात मी स्वत:देखील डान्स करायचे आणि इतरांचे देखील डान्सदेखील बसवायचे. त्यामुळे लहानपणीचा गणशोत्सव, माझी सोसायटी आणि मित्रमंडळीसोबत मी पुण्यालादेखील खूप मिस करत असते. 


 प्रथमेश परब : लहानपणी मी खूप हट्टी होतो. तो दिवस अजून ही आठवतो. ज्यावेळी मी आई वडिलांजवळ तीन चाकी सायकलचा हट्ट केला होता. त्यावेळी माझा सायकलचा हट्ट पूर्ण झाला नाही. त्यामुळे मी खूप आजारी पडलो. इतका ताप आला की, काही केल्या तो बराच होत नव्हता. मग आई बाबांनी मला नवीन सायकल आणून दिली.  त्यानंतर मी लगेच ठणठणीत झालो. लहानपणीची ही आठवण माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहणारी आहे. 

Web Title: How ruined are your favorite artists in their childhood? Learn with us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.