हृषिकेश कोळी या लेखकाला घ्ये डबल या चित्रपटाच्या नफ्यातला मिळणार १० टक्के वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 03:53 PM2018-09-06T15:53:13+5:302018-09-06T15:53:45+5:30

घ्ये डबल! या सिनेमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला १० टक्के वाटा मिळणार आहे. भविष्यात जर हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या भाषेत तयार झाला तर त्या चित्रपटातच्या नफ्यातला 10 टक्के वाटा हृषिकेशला मिळणार आहे.

Hrishikesh Koli's writer will get 10 percent share of Ghaya Double's profit | हृषिकेश कोळी या लेखकाला घ्ये डबल या चित्रपटाच्या नफ्यातला मिळणार १० टक्के वाटा

हृषिकेश कोळी या लेखकाला घ्ये डबल या चित्रपटाच्या नफ्यातला मिळणार १० टक्के वाटा

googlenewsNext

'नटसम्राट' आणि 'व्हॉट्सअॅप लग्न' या यशस्वी सिनेमांची निर्मिती करणारी विश्वास जोशी यांची फिनक्राफ्ट मीडिया अँड एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्था त्यांच्या तिसऱ्या सिनेमाची तय्यारी करत असून, या चित्रपटाचे टायटल घ्ये डबल! असे असणार आहे. विल्यम शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर या नाटकावर आधारित हा सिनेमा असून याचे दिग्दर्शन विश्वास जोशी आणि लेखन हृषिकेश कोळीचे आहे. सध्या घ्ये डबल! सिनेमाच्या पटकथेवर काम सुरू असून याचे संवादही हृषिकेशच लिहितोय. शेक्सपियरवरच्या लिखाणावर होऊ घातलेला मराठीतील हा पहिलाच सिनेमा आणि तोही कॉमेडी!

घ्ये डबल! या सिनेमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला १० टक्के वाटा मिळणार आहे. भविष्यात जर हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या भाषेत तयार झाला तर त्या चित्रपटातच्या नफ्यातला 10 टक्के वाटा हृषिकेशला मिळणार आहे. विश्वास जोशी यांनी निर्माता म्हणून उचललेलं हे पाऊल भविष्यात लेखकांसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकेल. म्हणून हृषिकेशला होणाऱ्या या प्रॉफिटला घे डबल म्हटले जाते आहे.

व्यावसायिक सिनेमातील कन्टेंटची नवी लाट न्यू वेव्ह  हृषिकेश बॉईज 2, बच्चन, आश्चर्य-फकीट, येरे येरे पैसा 2, माझा अगडबम अशा सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत आणतोय. त्यात या नव्या कराराने वेगळे सकारात्मक वळण आले आहे.

नेमके प्रेक्षकांना काय सांगायचे, त्यांचे मनोरंजन करत कुठल्या शब्दांत ते त्यांच्यापर्यंत पोहचवायचे, हे व्यावसायिक तंत्र हृषिकेशला गवसले आहे. त्यासाठी चित्रपटाचा विषय आणि तो पाहणारा प्रेक्षक याचा व्यावसायिकतेसाठी लागणारा दांडगा अभ्यास ही हृषिकेश कोळीची जमेची बाजू. त्यामुळे ‘बॉईज’ सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर एकाचवेळी समित कक्कड यांचा सोशिओ-पॉलिटीकल "बच्चन" असो किंवा मंटोच्या लिखाणावर आधारित "आश्चर्य-फ़क-इट"चे संवाद असो आणि अमेय खोपकर निर्मित "येरे येरे पैसा २" सारखा विनोदी चित्रपट असो, हृषिकेश कोळीने गंभीर ते विनोदी अशा वेगवेगळ्या शैलीत स्वत:चं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे.

Web Title: Hrishikesh Koli's writer will get 10 percent share of Ghaya Double's profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.