'टाइमपास ३'च्या प्रीमियरला हृता दुर्गुळेच्या सासूबाईंनी लावली हजेरी, सासू-सुनेत दिसलं छान बॉण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 01:14 PM2022-07-30T13:14:28+5:302022-07-30T13:15:00+5:30

Timepass 3: अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांचा टाइमपास ३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

Hruta Durgule's mother-in-law attends 'Timepass 3' premiere | 'टाइमपास ३'च्या प्रीमियरला हृता दुर्गुळेच्या सासूबाईंनी लावली हजेरी, सासू-सुनेत दिसलं छान बॉण्डिंग

'टाइमपास ३'च्या प्रीमियरला हृता दुर्गुळेच्या सासूबाईंनी लावली हजेरी, सासू-सुनेत दिसलं छान बॉण्डिंग

googlenewsNext

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांचा 'टाइमपास ३' (Timepass 3) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमियरला सिनेइंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या प्रीमियरला हृताचा नवरा प्रतीक शाह (Prateek Shah) आणि तिची सासू अभिनेत्री मुग्धा शाह (Mugdha Shah) यांनी हजेरी लावली होती. सासूबाईंना प्रीमियरला पाहून हृता खूप खूश झाली होती. यावेळी सासू सूनेमधील छान बॅण्डिंग पाहायला मिळाले.


टाइमपास 3 च्या प्रीमियरदरम्यानचा सासू सुनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हृता आणि तिची सासू मस्त स्टायलिश अंदाजात दिसत आहेत. मुग्धा आणि हृता यांच्यातील छान बॉण्डिंग पाहायला मिळाले. सासू सुनेपेक्षा त्यांच्यात मैत्रीचं नातं पाहायला मिळाल. सासू सुनेची हटके जोडी एकत्र पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला. हृताच्या चाहत्यांनाही सासू सुनेची ही जोडी खूप भावली आहे. टाइमपास ३च्या प्रीमियरला, चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टसह गायिका आर्या आंबेकर, हृताचा नवरा प्रतीक शाह यांच्यासह बरेच मंडळी उपस्थित होते.

हृता दुर्गुळेच्या सासूबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.  'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत.

तर हृताचा नवरा प्रतीक शाहदेखील हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने 'बेहद २', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदडी', 'इक दिवाना था'  या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
 

Web Title: Hruta Durgule's mother-in-law attends 'Timepass 3' premiere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.