हृता दुर्गुळेचा नवा लूक चर्चेत, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:37 PM2024-12-02T17:37:36+5:302024-12-02T17:38:05+5:30
Hruta Durgule :अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने इंस्टाग्रामवर नवीन लूक करतानाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे.
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री हृता दुर्गुळे( Hruta Durgule)ने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. हृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने नवा लूक केला असून त्याचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. हृताच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने इंस्टाग्रामवर नवीन लूक करतानाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, नवीन. नवीन सुरुवात. नवीन लूक. अमित यशवंत, विनोद सरोदेची मी आभारी आहे. या फोटोत हृताने शॉर्ट हेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तिने हा लूक कोणत्या आगामी प्रोजेक्टसाठी केला आहे का, हे अद्याप समजू शकलेले नाही.
वर्कफ्रंट
हृताने 'दुर्वा' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. 'फुलपाखरू' मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. मन उडू उडू झालं या मालिकेतही ती दिसली होती. याशिवाय 'टाईमपास ३', 'अनन्या', 'कन्नी' या सिनेमातही काम केले आहे. हृता 'कमांडर करण सक्सेना' या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना दिसली. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.