हृता दुर्गुळेचा 'टाइमपास ३' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 08:17 PM2022-09-14T20:17:08+5:302022-09-14T20:17:57+5:30

Timepass 3 :अभिनेता प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळेचा टाइमपास ३ चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Hruta Durgule's 'Timepass 3' will be coming to 'Ya' OTT platform | हृता दुर्गुळेचा 'टाइमपास ३' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार भेटीला

हृता दुर्गुळेचा 'टाइमपास ३' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार भेटीला

googlenewsNext

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि हृता दुर्गुळे(Hruta Durgule)चा 'टाइमपास ३' (Timepass 3) चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. रवी जाधव दिग्दर्शित या फ्रँचाईझीमध्ये हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा १६ सप्टेंबर रोजी झी ५वर प्रीमियर होणार आहे.

या यशस्वी फ्रँचाईझीमधल्या तिसऱ्या सिनेमात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे मुख्य भूमिकांत आहेत. ३६ टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू (प्रथमेश परब) कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो. आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या (हृता दुर्गुळे) प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या न्यायाने दगडूचं हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.


सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणाली, ‘या सिनेमात काम करताना माझ्यासमोर एकच आव्हान होतं आणि ते म्हणजे, भाषेचं. पालवी ज्या टोन किंवा लहेजामध्ये बोलते ते माझ्यासाठी सोपं नव्हतं. शूटिंगचा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता, विशेषतः पालवी म्हणून मी जेव्हा तयार झाले तो क्षण मी कधीही विसरणार नाही. तो सगळाच अनुभव माझ्यासाठी मजेदार आणि वेगळा होता.’

Web Title: Hruta Durgule's 'Timepass 3' will be coming to 'Ya' OTT platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.