‘पाटील’ला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:00 PM2018-12-29T18:00:00+5:302018-12-29T18:00:00+5:30

शिवाजी पाटील या कथानायकाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य  ते साध्य करून दाखवण्याची सकारात्मकता घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत आहेत.

The huge response of the audience to 'Patil' | ‘पाटील’ला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद

‘पाटील’ला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे

शिवाजी पाटील या कथानायकाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य  ते साध्य करून दाखवण्याची सकारात्मकता घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत आहेत. कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, या शहरात चित्रपटाचे शो हाऊसफुल जात आहे. दमदार कथा, सुयोग्य दिग्दर्शन, सकस अभिनय आणि कथेला अनुरूप गीत संगीत यामुळे पाटील या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.  

 या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जयशील मिजगर, तेजल शहा, नीता लाड, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे,  रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, सौरभ तांडेल,  दीपक दलाल, अभिराम सुधीर पाटील सहनिर्माते आहेत. चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: The huge response of the audience to 'Patil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.