'मी भारती सिंग किंवा कपिल शर्मा नव्हे', नेहा पेंडसेने ट्रोलर्सना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 13:36 IST2021-02-18T13:36:08+5:302021-02-18T13:36:38+5:30

Neha Pendse angry on trollers: ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतून नेहा पेंडसे अनिता भाभीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

I am not Bharti Singh or Kapil Sharma, Neha Pendse told the trollers | 'मी भारती सिंग किंवा कपिल शर्मा नव्हे', नेहा पेंडसेने ट्रोलर्सना सुनावले खडेबोल

'मी भारती सिंग किंवा कपिल शर्मा नव्हे', नेहा पेंडसेने ट्रोलर्सना सुनावले खडेबोल

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेस ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सब टीव्हीवरील ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेत नेहा पेंडसेची एन्ट्री झालीय. या मालिकेतून अनिता भाभीच्या भूमिकेत नेहा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या आधी सौम्या टंडन ही अभिनेत्री अनिता भाभाची भूमिका साकारत होती. काही कारणांमुळे सौम्याला मालिका सोडावी लागली. अनिता भाभी म्हणून मालिकेत नेहाची एन्ट्री होताच अनेकांनी नेहाची प्रशंसा केली. मात्र काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावरुन नेहाला ट्रोल केले आहे. 

‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतून नेहा पेंडसे अनिता भाभीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेहाला विनोदी अभिनय जमत नसल्याच्या टीका काही ट्रोलर्सनी केल्या. ट्रोलर्सच्या या टिकेला नेहाने चांगलेच उत्तर दिले आहे. कॉमेडी करुन लोकांना हसवायला मी काही कपिल शर्मा किंवा भारती सिंग नव्हे. परिस्थिती आणि भूमिकेनुसार विनोद केला जातो, असे म्हणत नेहाने ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिच्या भावना व्यक्त केल्या. नेहा पेंडसे म्हणाली की, प्रेक्षकांनी सौम्या टंडनला अनिता भाभी म्हणून स्वाकारले होते. त्यामुळे नव्या अनिता भाभीला स्वीकारण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र प्रेक्षक मलाही अनिता भाभीच्या भूमिकेत नक्की स्विकारतील. 


तर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी नेहा पेंडसेची निवड अगदी योग्य असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री सौम्या टंडन हिने दिली आहे.


नेहा पेंडसेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तिचा जून चित्रपट रिलीज झाला आहे. बिनधास्त आणि बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे गतवर्षी उद्योगपती शार्दुलसोबत लग्नबेडीत अडकली. तिच्या लग्नाचे फोटो आणि सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते.

Web Title: I am not Bharti Singh or Kapil Sharma, Neha Pendse told the trollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.