"देव म्हणजे काय मला माहित नाही पण...", अध्यात्माविषयी अशोक सराफ यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:47 IST2025-02-27T13:46:51+5:302025-02-27T13:47:47+5:30

Ashok Saraf : नुकतेच अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी अध्यात्मावरदेखील आपले मत व्यक्त केले.

"I don't know what God is, but...", Ashok Saraf expresses his opinion on spirituality | "देव म्हणजे काय मला माहित नाही पण...", अध्यात्माविषयी अशोक सराफ यांनी व्यक्त केलं मत

"देव म्हणजे काय मला माहित नाही पण...", अध्यात्माविषयी अशोक सराफ यांनी व्यक्त केलं मत

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अशोक सराफ यांचे सिनेमे प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. याशिवाय काही चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी निभावलेल्या गंभीर भूमिकाही चांगल्याच गाजल्या. नुकतेच अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी अध्यात्मावरदेखील आपले मत व्यक्त केले. 

अशोक सराफ म्हणाले की, अध्यात्म हे काय मला माहित नाही फार मोठी गोष्ट आहे ती पण मी देवभक्त आहे आमच्या लहानपणापासूनची जी शिकवण आई-वडिलांचे आमच्यावरचे संस्कार ते तेच आहेत. कारण ते देव भक्त होते ते मी फॉलो केलेलं आहे. पुढे आता देव म्हणजे काय हे मला माहित नाही. ती शक्ती आहे. एक काहीतरी आहे की जे कधी-कधी तुम्हाला मदत करते. कधी-कधी नाही करत. पण अशी शक्ती कुठेतरी असावी आणि ती आहे असे मला वाटते.

वर्कफ्रंट 
अभिनेते अशोक सराफ सध्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. ते अशोक मा. मा. या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. शेवटचे ते नवरा माझा नवसाचा २ या सिनेमात काम करताना दिसले. या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: "I don't know what God is, but...", Ashok Saraf expresses his opinion on spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.