Mrunmayee Deshpande Birthday : मी सगळ्या आशा गुंडाळून ठेवल्या होत्या..., मृण्मयी देशपांडेनं सांगितला लग्नाआधीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 01:44 PM2022-05-29T13:44:25+5:302022-05-29T13:46:34+5:30

Mrunmayee Deshpande Birthday : 3 डिसेंबर 2016 रोजी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि उद्योजक स्वप्नील राव हे दोघे विवाहबद्ध झाले. या लग्नाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती.

I had pinned all my hopes ..., Mrinmayi Deshpande told the story before marriage | Mrunmayee Deshpande Birthday : मी सगळ्या आशा गुंडाळून ठेवल्या होत्या..., मृण्मयी देशपांडेनं सांगितला लग्नाआधीचा किस्सा

Mrunmayee Deshpande Birthday : मी सगळ्या आशा गुंडाळून ठेवल्या होत्या..., मृण्मयी देशपांडेनं सांगितला लग्नाआधीचा किस्सा

googlenewsNext

Mrunmayee Deshpande Birthday :  ‘कुंकू’ या मालिकेतील सोशिक ‘जानकी’ आठवली की मृण्मयी देशपांडेचा (Mrunmayee Deshpande) गोड चेहरा डोळ्यांपुढे येतो. छोटा पडदा गाजवल्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. आज या मृण्मयीचा वाढदिवस.

3 डिसेंबर 2016 रोजी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि उद्योजक स्वप्नील राव हे दोघे विवाहबद्ध झाले. या लग्नाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. मृण्मयी व स्वप्नील यांची भेट कशी झाली? कुठे झाली? दोघांचं लव्हमॅरेज की अरेंज मॅरेज? असे प्रश्न तुमच्याही मनात असतील तर आज आम्ही त्याचबद्दल सांगणार आहोत.

खरं तर स्वप्नील आयुष्यात येण्याआधी मृण्मयी मुळातच प्रेम या भावनेबद्दल साशंक होती. प्रेम खरंच असतं का? असा प्रश्न तिला पडला होता. अगदी तिने सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. सुखदा खांडकेकरच्या ‘अनसेंसर्ड’ या कार्यक्रमात मृण्मयी बोलली होती. लग्नाआधीच्या आणि स्वप्नील आयुष्यात आल्यानंतरच्या भावना तिने बोलुन दाखवल्या होत्या.

ती म्हणाली होती, ‘स्वप्नील मला आयुष्याच्या अशा वळणावर भेटला ना की जेव्हा मी सगळ्या आशा सोडल्या होत्या. आपल्याला लग्न करायचं आहे, तेव्हा आपल्याला शोभेल असा मुलगा असावा, एवढाच विचार मी केला होता.  खूप

जणांनी मला एक ओळ ऐकवली होती. नाही तरी लग्न झाल्यावर रडायचंच आहे, बसमध्ये रडण्याऐवजी मर्सिडीजमध्ये रड...,असं खूप जण म्हणायचे. असा विचार करून लग्न करायचं असतं का? असा विचार माझ्या डोक्यात होता. मला काहीही आशा नव्हती. मी इतक्या सहजपणे प्रेमात पडीन आणि असं काहीतरी होईल, असं मला त्याक्षणी वाटलं नव्हतं. पण स्वप्नील आला आणि सगळं बदललं. मला जसा हवा होता, तसा स्वप्नील मला भेटला. जे काही डोक्यात सुरू होतं, ते स्वप्नील भेटल्यानंतर सगळं थांबलं. जोडीदार म्हणजे काय असतो, याचं उत्तर स्वप्नीलच्या रूपात मला मिळालं. तो भेटल्यानंतर  माझी मी मला सापडले.  त्याच्या इतक्या कणखर आणि ख-या व्यक्तीला भेटून माझं आयुष्य बदललं. माझा नव्याने प्रेमावर विश्वास बसला आणि पुन्हा नव्याने मी मला सापडले...’

तुमच्यावर प्रेम करणारा आणि तुम्हाला हवा तसा पार्टनर नक्की मिळतो. मात्र थोडी वाट बघावी लागते. त्यामुळे वाट बघताना तडजोड करू नका. जर तुम्ही लाखात एक असाल तर छोट्याश्या प्रेमात समाधानी होऊ नका, असंही मृण्मयी यावेळी म्हणाली.

स्वप्नील व मृण्मयीची भेट मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. पहिल्याच भेटीत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट म्हणतात, तसं दोघांबद्दलही घडलं होतं.

Web Title: I had pinned all my hopes ..., Mrinmayi Deshpande told the story before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.