"ह्या जागेचा आयुष्यभर ऋणी राहीन...", अभिनेता ललित प्रभाकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:36 PM2024-05-27T13:36:18+5:302024-05-27T13:37:12+5:30
Lalit Prabhakar : अभिनेता ललित प्रभाकरची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.
ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. हंपी, आनंदी गोपाळ या चित्रपटातील त्याच्या भूमिका खूप गाजल्या. जुळूनी येती रेशीमगाठी या मालिकेतून तो घराघरात पोहचला. ललित सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
ललित प्रभाकरने सोशल मीडियावर कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहातील फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, आचार्य अत्रे रंगमंदिर. ह्या जागेने खूप काही दिलं. असंख्य नाटकं बघितली, अनेक तालीमी केल्या प्रयोग केले, नाटकाच्या टेक्निकल गोष्टी शिकलो, स्टेज वर उभं राहायचा विश्वास वाढला, मित्रांशी मैत्री घट्ट झाली. घंटा घंटा घंटा घंटा घंटा च्या निमित्ताने १० वर्षानंतर या रंगमंचावर पुन्हा प्रयोग केला. ह्या जागेचा आयुष्यभर ऋणी राहीन.
वर्कफ्रंट
ललित प्रभाकरने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका तसंच ‘चि. व चि.सौ.कां’ या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. याशिवाय ढोल ताशे आणि पती गेले गं काठेवाडी यासह विविध नाटकतही त्याने प्रमुख तसंच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.