"या दोघी नसतील तर मी शून्य आहे...", केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट

By तेजल गावडे | Updated: March 8, 2025 09:53 IST2025-03-08T09:52:04+5:302025-03-08T09:53:33+5:30

आज जागतिक महिला दिन असून त्या निमित्ताने केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

''If it weren't for these two, I would be nothing...'', Kedar Shinde's special post on Women's Day | "या दोघी नसतील तर मी शून्य आहे...", केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट

"या दोघी नसतील तर मी शून्य आहे...", केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट

केदार शिंदे (Kedar Shinde) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी अनेक उत्तम कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ते सोशल मीडियावर सक्रीय असून ते या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. दरम्यान आज जागतिक महिला दिन असून त्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पत्नी आणि मुलीचं महत्त्व सांगितले आहे.

केदार शिंदे यांनी पत्नी बेला आणि लेक सना यांच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि लिहिले की, आज जागतिक महिला दिन. प्रत्येकाच्या पुरूषाच्या आयुष्यात स्त्री ही अविभाज्य घटक असते. कारण जन्म देणारीच एक स्त्री असते. पुढे आयुष्यात अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यात येतात. आई पासून सुरूवात जरी झाली तरी, मावशी आत्या आजी काकू.. ते शाळा कॅालेजात शिक्षिका... पण पुन्हा एक वळण येतं जेव्हा लग्न होतं. बेला शिंदे माझ्या आयुष्यात येणं हा टर्निंग पॉइंट होता. मी एकांकिका स्पर्धेत घडपडणारा.. अचानक संसाराची जबाबदारी अंगावर पडल्यावर, हातपाय मारू लागलो. माझ्या नाटक सिरीयल सिनेमाच्या प्रवासात अनेक चढउतार आले, येतायत, येतील.. खंबीरपणे साथ देणारी ‘ती‘ माझ्या सोबत आहे! 


त्यांनी पुढे म्हटले की, त्यानंतर मुलीच्या रूपात आयुष्यात आली ‘ती‘.. सना शिंदे. तिने जबाबदारी सोबतच मॅच्युअर बनवलं. आज माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे सना. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अपग्रेड रहाण्याचा मार्ग म्हणजे सना. या दोघी नसतील तर मी शून्य आहे. मी ३६५ दिवस त्यामुळेच महिला दिन साजरा करतो. 

वर्कफ्रंट
 शेवटचा त्यांना बाईपण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ते बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा बनवत आहेत. झापुक झुपूक असे या सिनेमाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग संपले. हा चित्रपट २५ एप्रिलला रिलीज होत आहे.
 

Web Title: ''If it weren't for these two, I would be nothing...'', Kedar Shinde's special post on Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.