इपितर चित्रपट 13 जुलैला सिनेमागृहात झळकणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 09:16 AM2018-06-16T09:16:45+5:302018-06-16T14:46:45+5:30

प्रत्येकजण कॉलेजविश्वात थोडासा ‘इपितर’ असतो. तरूणपणातला हा ‘इपितर’पणाचं काहीतर नवं करायचं स्फुरण देतं. असेच तीन ‘इपितर’ पुढच्या महिन्यात 13 ...

IIPER movie will be seen in the cinema on July 13! | इपितर चित्रपट 13 जुलैला सिनेमागृहात झळकणार !

इपितर चित्रपट 13 जुलैला सिनेमागृहात झळकणार !

googlenewsNext
रत्येकजण कॉलेजविश्वात थोडासा ‘इपितर’ असतो. तरूणपणातला हा ‘इपितर’पणाचं काहीतर नवं करायचं स्फुरण देतं. असेच तीन ‘इपितर’ पुढच्या महिन्यात 13 तारखेला आपल्याला भेटणार आहेत. परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्याची ही कथा आहे. सिनेमाचे नुकतेच ऑफिशिअल पोस्टर रिलीज झाले आहे.  

सिनेमाविषयी सांगताना निर्माते-लेखक किरण बेरड सांगतात, “ महाराष्ट्रात महाविद्यालये जून-जुलैमध्ये सुरू होतात. आणि मग ख-या अर्थाने जुलै महिन्यातच मैत्री फुलते.निसर्ग फुलतो. ह्या मैत्रीतल्या इपितरपणाचा आलेख जुलैपासूनच चढत जातो. म्हणून रूपेरी पडद्यावर 13 जुलैला इपितर चित्रपट रिलीज करायचा आम्ही विचार केला. इपितर हा टिपीकल गावाकडला शब्द आहे. इरसाल, बिलंदर ह्या अर्थाने त्याचा वापर केला जातो. अशाच तीन इरसाल मुलांची कथा तुम्हांला इपितर सिनेमातून दिसणार आहे. विनोदी ढंगाने जाताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केलेला आहे.” 

चित्रपटाचे दिग्दर्शक-सहनिर्माते दत्ता तारडे म्हणतात, “हा सिनेमा क़ॉलेजविश्वात इरसालपणा केलेल्या प्रत्येक तरूणाचं प्रतिनिधीत्व करतो. सिनेमा पाहताना तुम्हांला तुमच्या कॉलेज जीवनातला इपितरपणा नक्की आठवेल. डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे. सुधीर बोरूडे, दत्ता तारडे आणि विकास इंगळे ह्यांची सहनिर्मिती असलेल्या इपितर ह्या विनोदी सिनेमाचे लेखन किरण बेरड ह्यांनी केले असून दिग्दर्शन दत्ता तारडे ह्यांनी केले आहे. भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे ,निकिता सुखदेव, वृंदा बाळ आणि सुहास दुधाडे ह्यांच्या मुख्य भूमिका असलेला इपितर हा सिनेमा 13 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.

Web Title: IIPER movie will be seen in the cinema on July 13!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.