​सैराट सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ- भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2016 01:45 PM2016-07-19T13:45:49+5:302016-07-19T19:15:49+5:30

‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून बलात्काराच्या घटना वाढत आहेत, असे आगळेवेगळे विधान भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मांडलं आहे. ...

Increase in rape for the movies like Sairat - BJP MLAs | ​सैराट सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ- भाजपा आमदार

​सैराट सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ- भाजपा आमदार

googlenewsNext
ैराट’सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून बलात्काराच्या घटना वाढत आहेत, असे आगळेवेगळे विधान भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मांडलं आहे.
कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर मनिषा चौधरी यांनी असे विवादास्पद विधान केले आहे. एवढेच नाहीतर, ‘सैराट’ सारख्या चित्रपटांवर बंदी आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.  
महिलांवर अत्याचार करणाºयांना सौदी अरेबियात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जाते, तशीच द्यावी. त्यामुळे महिला-मुलींवर बलात्कार झाला की तातडीने नराधमाचे हात तोडले पाहिजेत, असंही मनिषा चौधरी म्हणाल्या. बलात्कारानंतर खटला चालेल, दोषीला शिक्षा होईल, ही प्रक्रिया मोठी आहे. 

 

Web Title: Increase in rape for the movies like Sairat - BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.