Independence Day: 'माँ तुझे सलाम' गाण्यावर डान्स करत अमृता खानविलकरच्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 10:00 AM2024-08-15T10:00:29+5:302024-08-15T10:00:51+5:30

Celebrate Swatantrata Diwas 2024: १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही खास अंदाजात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Independence Day 2024 marathi actress amruta khanvilkar dance on maa tuze salam video | Independence Day: 'माँ तुझे सलाम' गाण्यावर डान्स करत अमृता खानविलकरच्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

Independence Day: 'माँ तुझे सलाम' गाण्यावर डान्स करत अमृता खानविलकरच्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

आज देशात सर्वत्र भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही खास अंदाजात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने गेट वे ऑफ इंडिया येथे डान्स करत चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अमृताने कोरिओग्राफर आशिष पाटील याच्यासोबत 'माँ तुझे सलाम' या गाण्यावर डान्स केला आहे. तिरंग्याच्या रंगाचे कपडे परिधान करून अमृताने आणि आशिषने हा ग्रुप डान्स करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत त्यांच्या डान्सची खास झलक पाहायला मिळत आहे.  अमृताच्या या डान्सने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी अमृताचं कौतुक केलं आहे. चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही अमृताच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. प्रसाद ओक, मंजिरी ओक, अंकिता लोखंडे या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. 


अमृताबरोबरच अनेक टीव्ही कलाकारांनीही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिन साजरा केला. सोशल मीडियावर कलाकारांनी स्वातंत्र्यदिनाबाबत पोस्टही केल्या आहेत. या पोस्टमधून कलाकारांनी ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत. 

Web Title: Independence Day 2024 marathi actress amruta khanvilkar dance on maa tuze salam video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.